Ketu-Mangal Yuti saam tv
राशिभविष्य

Ketu-Mangal Yuti: केतू-मंगळाच्या युतीने बनणार अंगारक योग; जूनपासून 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य, रिकामी तिजोरी भरणार

Ketu-Mangal Yuti 2025: ग्रहांचा सेनापती मंगळही जून महिन्यात राशी बदलणार आहे. यावेळी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती होऊन अंगारक योगाची निर्मिती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये केतूला पापी ग्रह मानलं जातं. परंतु त्याचा प्रभाव सर्व राशींवर खूप असतो. केतू एका ठराविक कालावधीनंतर म्हणजेच तब्बल 18 महिन्यांनी राशी बदलतो. सध्या केतू कन्या राशीत विराजमान आहे. पण मे महिन्यात तो राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. केतू नेहमी वक्री चालीने चालतो.

यावेळी ग्रहांचा सेनापती मंगळही जून महिन्यात राशी बदलणार आहे. यावेळी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती होऊन अंगारक योगाची निर्मिती होणार आहे. हा योग सर्वात विध्वंसक योग असल्याचं म्हटलं जातं. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींवर याचा चांगला परिणाम होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, केतू 18 मे 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ 7 जून रोजी पहाटे 2 वाजून 28 मिनिटांनी प्रवेश करेल. ज्यामुळे हे दोन्ही ग्रह सिंह राशीत संयोग करून अंगारक योग तयार करत आहेत.

मिथुन रास

या राशीच्या जातकांसाठी केतू-मंगळाची युती शुभ ठरणार आहे. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असणार आहे. समाजात मान-सन्मानात वाढणार आहे. तुम्ही या काळात तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. अचानक तुमच्या हाती चांगल्या कामाने पैसा येणार आहे.

सिंह रास

या राशीच्या लग्नभावात मंगळ आणि केतू यांची युती आहे. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. केतूमुळे तुम्ही स्वत:बद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. नोकरीची तयारी करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. तुम्हाला कोर्टाच्या प्रकरणातून दिलासा मिळणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी अंगारक योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अफाट यश मिळवू शकतात. या राशीचे लोक अनेक धार्मिक यात्रेला जाऊ शकतात. या काळात जीवनात आनंद येऊ शकतो. इतर ठिकाणी नोकरीची ऑफर मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT