trigrahi rajyog pisces saam tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog 2025: हरतालिकेनंतर 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; महालक्ष्मी राजयोगामुळे मिळणार धन-संपत्ती

Hartalika Teej 2025 zodiac benefits: भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष महत्त्व आहे. हरतालिका तीज हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण आहे, जो विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली चांगल्या पतीसाठी करतात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात जलद गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. चंद्र साधारणपणे प्रत्येक राशीत अडीच दिवस इतका काळ थांबतो. त्यामुळे त्याचा इतर ग्रहांशी योग अथवा दृष्ट संबंध होत राहतो आणि त्यातून शुभ-अशुभ परिणाम दिसून येतात.

येत्या काळात लवकरच चंद्र आणि मंगळ यांची युती होत असून त्यातून चंद्र-मंगळ योग म्हणजेच महालक्ष्मी योग तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींवर विशेषतः लक्ष्मीमातेची कृपा होईल. दीर्घकाळ अडकलेली कामं पूर्ण होतील. त्याचप्रमाणे करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात.

महालक्ष्मी योगाची वेळ

वैदिक पंचांगानुसार सध्या ग्रहसेनापती मंगळ कन्या राशीत आहेत. येत्या २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.२८ वाजता चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल आणि २७ ऑगस्ट संध्याकाळी ७.२१ वाजेपर्यंत तिथेच राहणार आहे. त्यानंतर तो तुला राशीत जाणार आहे. त्यामुळे हा महालक्ष्मी योग साधारण ५४ तासांपर्यंत असणार आहे.

कन्या राशी

कन्या राशीत चंद्र-मंगळाची ही युती थेट लग्नभावात होत असल्यामुळे या राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. मित्रांसोबत आनंदी क्षण घालवता येतील तसंच कुटुंबासोबत छोट्या प्रवासाची संधीही मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अडचणींचे निराकरण होऊ शकेल.

कर्क राशी

या राशीत महालक्ष्मी योग तिसऱ्या भावात तयार होतोय. त्यामुळे या काळात कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये संवादकौशल्य प्रचंड वाढणार आहे. नोकरीत किंवा व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करता येतील, त्यामुळे मानसिक तणाव कमी होणार आहे. दीर्घकाळ त्रास देणाऱ्या आरोग्याच्या समस्या देखील कमी होऊ शकतात

कुंभ राशी

या राशीत चंद्र-मंगळाची युती अष्टम भावात होतोय. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात चांगले लाभ मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत योग्य ठरू शकणार आहे. पूर्वीच्या अडथळ्यांवर मात करून करिअरमध्ये प्रगती साधता येणार आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT