Shani Surya Yuti 2025 saam tv
राशिभविष्य

Surya Shani Yuti 2025: होळीनंतर शत्रू ग्रह सूर्य-शनीची होणार युती; 'या' ३ राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Sun Saturn Conjunction After Holi: सध्या एकमेकांचे शत्रू असलेले सूर्य आणि शनी कुंभ राशीत एकत्र बसून युती करणार आहेत. होळीच्या दिवशी म्हणजेच 14 मार्च 2025 रोजी सूर्य कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत विराजमान होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं ज्योतिष्य शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. सूर्यमालेतील या प्रत्येक ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलं असून शुक्र आणि शनी यांना खास महत्त्व आहे. सध्या एकमेकांचे शत्रू असलेले सूर्य आणि शनी कुंभ राशीत एकत्र बसून युती करणार आहेत. होळीच्या दिवशी म्हणजेच 14 मार्च 2025 रोजी सूर्य कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत विराजमान होणार आहेत.

शुक्रवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय शनिवारी २९ मार्च रोजी रात्री ११ वाजून १ मिनिटांनी शनी मीन राशीत भ्रमण करणार आहे. अशावेळी पुन्हा सूर्य-शनी युती तयार होणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांची स्थिती काही राशींना मालामाल कऱणार आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि शनीची युती फायदेशीर ठरणार आहे. संपत्ती वाढीची शक्यता आहे. ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन असू शकतो. मन पूर्वीपेक्षा प्रसन्न राहणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी शनी-रवि युती फलदायी ठरणार आहे. रखडलेली कामं तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. घरात नातेवाईक ये-जा करतील. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक वाढू शकणार आहे. तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांची मनं जिंकू शकता. वादविवादांपासून दूर राहा.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य-शनी युती फलदायी ठरणार आहे. मीन राशीत दोन्ही ग्रह एकत्र विराजमान होणार आहेत. धार्मिक कार्यात रस वाटू शकतं. तुम्ही लोकांमध्ये नवी ओळख निर्माण करू शकणार आहात. धनवृद्धीसाठी केलेली मेहनत यशस्वी होणार आहे. करिअर, व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना यश मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT