Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: होळी संपल्यावर मंगळ करणार 'या' राशींना दुःखी; प्रत्येक कामात येणार विघ्न

Mangal Gochar 2025: ग्रहांचा सेनापती मंगळ ठराविक काळानंतर राशी बदलतो. मंगळ हा मातीचा पुत्र, युद्धाचा देव, तसेच सामर्थ्य, उर्जा, धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ तर अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतं. ग्रहांचा सेनापती मंगळ ठराविक काळानंतर राशी बदलतो. मंगळ हा मातीचा पुत्र, युद्धाचा देव, तसेच सामर्थ्य, उर्जा, धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो.

सध्या मंगळ मिथुन राशीत असून होळीनंतर म्हणजे 3 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:56 वाजता मंगळ पुन्हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आपल्या निम्न राशीत येत असल्यामुळे काही राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अशुभाचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहेत ते पाहूयात.

मेष रास

या राशीमध्ये मंगळ पहिल्या आणि आठव्या घराचा स्वामी असेल आणि चौथ्या घरात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप गडबड होऊ शकणार आहे. तुमच्या कुटुंबातील काही समस्यांमुळे तुम्ही खूप चिंतेत असणार आहात. व्यवसायातही मोठ्या संधी तुमच्या हातातून निसटू शकणार आहेत. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी मंगळ कर्क राशीत गेल्याने खूप त्रास होऊ शक्यता असते. कौटुंबिक बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. कोणतंही काम करताना किंवा कामाच्या ठिकाणी बोलताना थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा.

मीन रास

मंगळ हा आपल्या निम्न राशीत जात असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुम्ही कामाच्या बाबतीत खूप चिंतेत असणार आहात. कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडा त्रास जाणवणार आहे. तुमच्याकडून अनेक चुका होऊ शकतात. कोणत्याही कामात जोडीदाराची साथ मिळणार नाही.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

Petrol-Diesel: देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा? PM मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Tuesday Horoscope: जास्तीचा खर्च होईल, गणपती बाप्पा पावणार; ५ राशींची होणार भरभराट

SCROLL FOR NEXT