Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Budhaditya Rajyog: एका वर्षानंतर मंगळ राशीत बनणार बुधादित्य राजयोग; दिवाळीनंतर 'या' राशींना येणार 'अच्छे दिन'

Budhaditya Rajyog In Scorpio: बुध ग्रहाने २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे आणि त्यासोबतच १७ नोव्हेंबरला ग्रहांचा राजा सूर्य देव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. बुध ग्रहाने २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे आणि त्यासोबतच १७ नोव्हेंबरला ग्रहांचा राजा सूर्य देव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या गोचरमुळे वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे. यामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींवर याचा प्रभाव दिसून येणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

तूळ रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. जर तुम्हाला अद्याप चांगला जोडीदार मिळाला नसेल तर हा महिना आयुष्यात नवीन आनंद आणू शकतो. तुम्ही पैसे वाचवू शकणार आहात. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

मकर रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा राजयोग तयार होणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढणार आहे. तुम्हाला व्यवसायात पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळणार आहे. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे.

कुंभ रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकणार आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी लाभ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

लिंबू सरबत की ऊसाचा रस, कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य?

SCROLL FOR NEXT