Shatgrahi Yog saam tv
राशिभविष्य

Shatgrahi Yog : 57 वर्षांनी मीन राशीत भरणार ग्रहांचा मेळावा, षठग्रही योग 'या' राशींना करणार मालामाल

Shatgrahi Yog 2025: मार्च महिन्यात शनि, शुक्र, बुध, सूर्य आणि चंद्र हे राहूसोबत मीन राशीत एकत्र प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत षठग्रही योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी या बदलाचा 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. मार्च 2025 मध्ये मीन राशीच्या ग्रहांचा जणू मेळावा भरणार आहे. मार्च महिन्यात शनि, शुक्र, बुध, सूर्य आणि चंद्र हे राहूसोबत मीन राशीत एकत्र प्रवेश करणार आहेत. अशा स्थितीत षट ग्रही योग तयार होणार आहे.

मीन राशीत राहु स्थित असून फेब्रुवारीमध्ये शुक्र आणि बुध ग्रहांचा प्रवेश होणार आहे. यानंतर 14 मार्चला सूर्य, 29 मार्चला शनि आणि 28 मार्चला चंद्र प्रवेश करणार आहे. 29 मार्च रोजी राहू, बुध, सूर्य, शनि, शुक्र आणि चंद्र मीन राशीत एकत्र असतील. अशा प्रकारे 29 मार्च रोजी मीन राशीत 6 ग्रहांचा महाकुंभ होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी षठग्रही योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता वाढू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास झपाट्याने वाढू शकतो. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठीही हा आठवडा चांगला जाणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत.

मिथुन रास

या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात अचानक यश मिळू शकणार आहे. सूर्य आणि गुरूच्या आशीर्वादाने तुम्ही भरपूर पैसा मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्ही काम किंवा व्यवसायासाठी बाहेर प्रवास करू शकता. शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. तुम्ही व्यवसायात तुम्ही बनवलेल्या पॉलिसींमधून भरपूर नफा मिळवू शकता.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी जीवनात केवळ आनंद येणार आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकतात. तुमच्या आयुष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. मुलांच्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT