Dhan Shakti Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Ardhakendra Yog: 48 तासांनंतर 'या' राशींची होणार चांदीच चांदी; गुरु-सूर्य बनवणार अद्भुत योग, धनलाभही होणार

Guru Surya Ardhakendra Yog 2025: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. जेव्हा दोन शक्तिशाली ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्यांचे शुभ-अशुभ परिणाम दिसून येतात. आता लवकरच ग्रहांचा राजा सूर्य आणि ज्ञान व भाग्याचा कारक ग्रह गुरु यांची युती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह काही काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी राशी बदलतात आणि त्याचा थेट परिणाम बारा राशींवर होत असतो. तसंच देश-विदेशातील घडामोडींवर परिणाम करतो. देवगुरू बृहस्पति वर्षातून एकदा आपली रास बदलतात आणि त्यावेळी ते इतर ग्रहांशी संयोग करतात. सध्या बृहस्पति आणि सूर्याचा संयोग होत असून त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे.

या काळात सूर्य सिंह राशीत तर गुरु मिथुन राशीत स्थित आहेत. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद आणि यश येणार आहे. वैदिक पंचांगानुसार, 24 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून 45 अंशांवर असणार आहेत. याच वेळी अर्धकेंद्र योग निर्माण होईल.

या वेळी गुरु आपल्या मित्र ग्रहाच्या राशीत म्हणजे मिथुन राशीत असतील तर सूर्य स्वतःच्या स्वराशीत म्हणजे सिंह राशीत असणार आहे. या दोन प्रभावी ग्रहांचा संयोग काही राशींचे नशीब उजळवू शकतो. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीत गुरु लग्न भावात असून सूर्य तिसऱ्या भावात आहेत. मेहनतीचं फळ आता गोड मिळणार आहे. नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होणार असून कोर्ट-कचेरी किंवा शासन-प्रशासनाशी संबंधित कामं सोप्या पद्धतीने पूर्ण होणार आहेत.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना हा संयोग आनंद देणारा ठरणार आहे. उत्पन्नात वाढ होईल आणि घरगुती वातावरण सुखकर बनणार आहे. विवाहासाठी योग्य जुळणी मिळू शकणार आहे. प्रेमसंबंधातील अडचणी दूर होऊन नातेसंबंध सुधारणार आहेत. वडिलांशी नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे

तूळ रास (Libra)

तुला राशीसाठी सूर्य-गुरूचा अर्धकेंद्र योग मोठा लाभदायक आहे. खूप दिवसांपासून अडकलेली कामे आता पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्न वाढणार आहे. व्यापाऱ्यांना विशेष यश मिळणार आहे. पद-प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. वडील व गुरूंचा पूर्ण सहकार्य लाभेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT