Shani Uday saam tv
राशिभविष्य

Shani Margi: 30 वर्षांनंतर शनीदेव होणार मार्गस्थ; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत सुमारे अडीच वर्षांनी प्रवेश करतात. अशा प्रकारे, सर्व १२ राशींचे एक पूर्ण चक्र पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे ३० वर्षांचा कालावधी लागतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्योतिषशास्त्रात, शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. यामध्ये शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. यावेळी त्याला एका राशीत परत येण्यासाठी सुमारे ३० वर्षे लागतात. शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो.

शनि सध्या गुरूच्या मीन राशीत असून तो जून २०२७ पर्यंत या राशीत राहणार आहे. या काळात त्याची स्थिती बदलत राहणार आहे. जुलै महिन्यात शनि मीन राशीत वक्री होणार आहे. यावेळी शनी सुमारे १३८ दिवस या स्थितीत राहणार आहेत. यानंतर २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता शनि मीन राशीत मार्गी जाणार आहे. शनि मार्गी झाल्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणारे ते पाहूयात.

मकर रास

या राशीच्या तिसऱ्या घरात शनि मार्गी असणार आहे. तिसऱ्या घरात बसून शनि पाचव्या, नवव्या घर आणि बाराव्या घराकडे पाहतोय. यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. मुलांकडून सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. बौद्धिक क्षमता वाढणार आहे. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात.

कुंभ रास

या राशीच्या दुसऱ्या घरात शनि थेट असणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक समस्यांपासून आराम मिळू शकणार आहे. व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनाही खूप चांगले फायदे मिळू शकतात.

मिथुन रास

शनीच्या मार्गी स्थितीमुळे राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या कोणत्याही समस्या किंवा आव्हानं हळूहळू कमी होणार आहेत. बराच काळ अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. गुंतवणुकीमुळे आता व्यवसायात चांगला नफा मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT