Shani Dev Vakri In Meen saam tv
राशिभविष्य

Shani Vakri 2026: 30 वर्षांनंतर शनी चालणार वक्री चाल; या राशींना मिळणार लाभाची संधी

Saturn retrograde 2026 zodiac signs: शनी ग्रह ३० वर्षांनंतर पुन्हा वक्री स्थितीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीची वक्री गती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या काळात काही राशींना विशेष लाभ मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनिदेव हे सुमारे अडीच वर्षांच्या अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. सुमारे ३० वर्षांनी शनि गुरुच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे आहे. या काळात शनि कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती करणार आहेत. ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतील.

जुलैमध्ये शनी मीन राशीत वक्री होणार आहे. यामुळे शनीची वक्री गती मागील एका घरासाठी देखील परिणाम देणार आहे. १२ पैकी या तीन राशींना शनीच्या वक्री गतीचा मोठा फायदा होऊ शकणार आहे. शनीच्या वक्री गतीचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री गती खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या गोचर कुंडलीच्या बाराव्या घरात शनि स्थित असणार आहे. शनीच्या वक्री गतीमुळे या लोकांना करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. करिअरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेला विलंब आता संपू शकतो. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपू शकतात.

कर्क रास

या राशीसाठी नवव्या घरात शनि वक्री असणार आहे. तुमच्या कामामुळे तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळू शकतं. हा काळ व्यावसायिकांसाठी देखील खूप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या प्रवासाला निघू शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो.

मकर रास

या राशीच्या तिसऱ्या घरात शनि ग्रह मागे जाणार आहे. राहू या राशीच्या दुसऱ्या घरात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे मिश्र परिणाम आणण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये खूप चांगले परिणाम दिसू शकतात. नोकरीच्या अनेक नवीन संधी निर्माण होऊ शकतात. परदेशात जाण्याचं स्वप्न देखील पूर्ण होऊ शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT