Shadashtak Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Shadashtak Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार पॉवरफुल षडाष्टक योग, 'या' राशींना मिळू शकणार पैसा; नव्या नोकरीचेही संकेत

Shadashtak Yog 2025: येत्या काळात म्हणजे जून महिन्यात मंगळ आणि शनी यांच्यामुळे एक योग निर्माण होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, मंगळ हा भूमिपूत्र मानला जातो. मंगळ ग्रह हा वेळोवेळी त्याच्या राशीमध्ये बदल करतो. जेव्हाही मंगळ त्याच्या राशीत बदल करतो तेव्हा सर्व राशींच्या व्यक्तींवर त्याचा काही ना काही परिणाम होत असतो. येत्या काळात मंगळ आणि शनी एक योग तयार करणार आहेत.

सध्या मंगळ कर्क राशीमध्ये विराजमान असून ७ जून रोजी तो सिंह राशीत प्रवेश कऱणार आहे. मंगळ ग्रह सिंह राशीत येताच मीन राशीत असलेल्या शनीसोबत योग तयार करणार आहे. या योगाचं नाव षडाष्टक असून हा फार धोकादायक योग मानला जातो. मात्र काही राशींना याचा लाभ मिळेल. मंगळ आणि शनीचा हा धोकादायक योग कोणत्या राशींच्या आयुष्यावर चांगला परिणाम करणार आहे ते पाहूयात.

मीन रास

या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग लकी ठरणार आहे. या काळात भावंडांमध्ये प्रेम वाढणार आहे. वैवाहिक जीवनात असलेला चढ-उतार दूर होणार आहेत. आरोग्यासंबंधीच्या समस्या दूर होऊ शकणार आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

वृश्चिक रास

षडाष्टक योग हा या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशींच्या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये लाभ मिळणार आहे. बिझनेसमध्येही तुम्हाला चांगला फायदा मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रमोशनची बोलणी केली जातील. येत्या काळात तुम्हाला चांगल्या बातम्या मिळू शकणार आहे.

मिथुन रास

षडाष्टक योग हा योग या राशींसाठी चांगला मानला जातोय. तुम्ही तुमच्या कामामध्ये चांगलं काम करू शकणार आहात. तुम्हाला बिझनेसमध्ये चांगली डील मिळू शकते. परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत आहेत. पैसा कमावण्याची तुम्हाला उत्तम संधी मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT