Conjunction Of Shani And Budh saam tv
राशिभविष्य

Dashank Yog: 30 वर्षांनंतर न्यायाधीश शनी बनवणार अद्भुत योग; 'या' राशींना होणार धनलाभ

Dashank Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा ग्रह सर्वात मंद गतीने राशी बदलतो. तो एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतो आणि संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला सुमारे ३० वर्षे लागतात.

Surabhi Jayashree Jagdish

शनि हा न्यायाचा देव आणि दंडक मानला जातो. शनीदेव लोकांना त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनि हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. शनीला एक राशी सोडण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. यावेळी जर शनीची वाईट नजर एखाद्यावर पडली तर त्याचे जीवन नरकासारखं बनतं.

शनि सध्या मीन राशीत आहे आणि कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी त्याची युती होत असते. यावेळी शनि आणि शुक्र यांच्या संयोगाने दशांक योग तयार होणार आहे. शनि-शुक्र यांच्या दशांक योगामुळे या तीन राशींना फायदा मिळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते आपण पाहूयात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनीचा दशंक योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. कर्म आणि लाभ भावात या दोन्ही ग्रहांच्या उपस्थितीमुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात लाभ मिळू शकणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही पैसे कमवण्यासोबतच बचत करण्यात यशस्वी होऊ शकणार आहात.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी शनि-शुक्र ग्रहाचा दशंक योग अनुकूल राहू शकणार आहे. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतात. बेरोजगार लोकांना नोकरीच्या संधी मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. उत्पन्नही वेगाने वाढू शकते.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनीचा दशंक योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. खर्च थोडा वाढू शकणार आहे. पण तुम्ही त्याचा योग्य ठिकाणी वापर करू शकता. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. जोडीदाराशी चांगला समन्वय असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT