Shani Gochar 2025 Saam Tv
राशिभविष्य

Shani Gochar: 27 वर्षांनंतर शनी करणार स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन, आर्थिक लाभ होणार

Shani Gochar 2025: सध्या शनी ग्रह पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये स्थित आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या अखेरीस तो आपली नक्षत्रस्थिती बदलणार आहे. यावेळी शनी आपल्या स्वतःच्या उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीच्या या विशेष गोचरामुळे काही राशींना जबरदस्त फायदे मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनी सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह असून तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनि एका राशीत अडीच वर्षे आणि एका नक्षत्रात सुमारे एक वर्ष राहतो. अशा परिस्थितीत, पुन्हा एका नक्षत्रात परत येण्यासाठी सुमारे २७ वर्षांचा कालवधी लागतो.

शनि सध्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रात स्थित आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस शनी त्याच्या नक्षत्रात बदल करणार आहे. यावेळी शनी उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीच्या स्वतःच्या नक्षत्रात आल्यामुळे काही राशीच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात. यावेळी काही राशींच्या आर्थिक लाभ होणार आहेत, तर काहींना चांगले पैसे मिळू शकणार आहेत.

शनी त्याच्या नक्षत्रात म्हणजेच उत्तरा भाद्रपदात २८ एप्रिल रोजी सकाळी ७:५२ वाजता प्रवेश करणार आहे. २७ नक्षत्रांपैकी उत्तरा भाद्रपद हे २६ वं नक्षत्र मानण्यात येतं. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

शनि उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी या राशींचं लोकांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या सोडवता येणार आहेत. यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. अनावश्यक खर्चापासूनही दिलासा मिळू शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी, उत्तराभाद्रपदातील शनीची हालचाल भाग्यवान ठरू शकणार आहे. शनि स्वतःच्या नक्षत्रात गेल्याने तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळू शकतात. यावेळी आरोग्यात सुधारणा होऊ शकते. मार्केटिंग आणि नेटवर्किंगमध्ये गुंतलेल्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या धाकट्या भावांसोबत तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात मोठे बदल दिसणार आहेत. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होऊ शकणार आहे. तुमच्या कारकिर्दीत बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. परदेशातूनही पैसे कमवण्याच्या संधी असू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT