Mangal vakri saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar: 18 महिन्यांनी भूमिपूत्र मंगळ करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींना मिळणार धन-संपत्ती, नशीबही चमकणार

शास्त्रानुसार, येत्या जून महिन्यात मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर जाणवेल. यावेळी काही विशिष्ट राशींना मंगळ ग्रहाचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये मंगळ हा रक्त, क्रोध, मालमत्ता, सैन्य यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो.

शास्त्रानुसार, जून महिन्यात मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांना मंगळ ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशीच्या व्यक्तींना मंगळाच्या गोचरचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो . कारण मंगळ तुमच्या गोचर कुंडलीतून लग्नाच्या ठिकाणी येणार आहे. या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. तसंच तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. या काळात तुमची सामाजिक लोकप्रियता वाढू शकणार आहे.

तूळ रास

मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. प्रवासातून तुम्हाला फायदा होऊ शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन योजना राबवण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT