Samsaptak Rajyog saam tv
राशिभविष्य

Samsaptak Rajyog 2024: १२ वर्षांनी बुध-गुरुने बनवला समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा!

Samsaptak Rajyog 2024: या ग्रहांमध्ये गुरु-बुध यांना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये वक्री असून बुध वृश्चिक राशीतही वक्री झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे एकाच राशीत दोन ग्रह येतात. ग्रहांच्या या युतीमुळे राजयोग तयार होतात. या ग्रहांमध्ये गुरु-बुध यांना अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. सध्या गुरू वृषभ राशीमध्ये वक्री असून बुध वृश्चिक राशीतही वक्री झाला आहे.

अशा स्थितीत गुरू आणि बुध हे दोन्ही ग्रह वक्री गतीने फिरत असल्याने ते समोरासमोर उभे आहेत. या स्थितीमुळे समसप्तक राजयोग तयार होतोय. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकणार आहे. समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीमध्ये गुरु मजबूत स्थितीत असून या राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. गुरू-बुध मागे गेल्यावरही प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. इतर लोक तुमच्या कामाचे कौतुक करणार आहे. तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येणार आहे.

सिंह रास

आर्थिक लाभाचा स्वामी बुध या राशीच्या चौथ्या भावात आहे. यासोबतच गुरू दहाव्या घरात वक्री आहे. या राशीच्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होणार आहे. समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना नोकरीत नवीन संधी मिळून बढती मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळवू शकणार आहात. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. पगारवाढीसह पदोन्नतीची शक्यता आहे. नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग देखील खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. करियरमध्ये तुम्हाला अनेक संधी मिळू शकणार आहेत. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात चांगला नफा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT