Hans Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Jupiter retrograde 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाची स्थिती आणि गती मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकते. गुरु ग्रह (बृहस्पति), ज्याला ज्ञान, धन, विवाह आणि भाग्याचा कारक मानले जाते, तो जेव्हा आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचे परिणाम सर्व राशींवर दिसून येतात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा वक्री आणि मार्गी होणं या केवळ आकाशातील घटना नाहीयेत. त्याचा परिणाम थेट पृथ्वीवर आणि व्यक्तींच्या जीवनावर होत असतो. अशाच एका महत्त्वाच्या आणि शुभ घटनेचा काळ पुन्हा एकदा आला आहे. यामध्ये देवतांचा गुरु बृहस्पती १२ वर्षांनंतर वक्री होणार आहेत आणि याच घटनेमुळे हंस महापुरुष राजयोग तयार होणार आहे.

हा विशेष योग ऑक्टोबर २०२५ मध्ये निर्माण होणार आहे. हंस योग हा अतिशय शुभ आणि सन्मान, समृद्धी देणारा राजयोग मानला जातो. त्यामुळे काही भाग्यशाली राशींना याचा विशेष लाभ होणार असून अचानक धनलाभ, व्यवसायात यश, प्रमोशन, कौटुंबिक आनंद येणार आहे.

कन्या रास

कन्या राशीसाठी हा योग खूपच शुभ आहे. कारण हंस योग त्यांच्या गोचर कुंडलीतील ११ व्या भावात तयार होणार आहे. लाभ, कमाई आणि इच्छा पूर्ण होण्याचा भाव मानला जातो. या काळात आपली आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे. वेतनवाढीची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून मोठा नफा होऊ शकतो.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी बृहस्पती नवम भावात वक्री होणार आहे. जो भाग्य आणि धर्मभावाचं घर आहे. त्यामुळे हा कालखंड अत्यंत शुभ ठरणार आहे. यावेळी भाग्याची साथ मिळणार आहे. याशिवाय अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. या काळात धर्म आणि आध्यात्मिक कामांमध्ये तुमची रुची वाढणार आहे.

तूळ रास

तूळ राशीसाठी राशीसाठी हंस योग दशम भावात म्हणजेच कर्म आणि करिअर भावात होतोय. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली डील मिळू शकते आणि उत्पन्नात वाढ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: ४० चोर घेऊन येवल्याचा आली बाबा लय बोलतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर प्रहार|VIDEO

Aabeer Gulaal: पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात होणार प्रदर्शित? वाचा महत्वाची अपडेट

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर ऐकून थक्क व्हाल

महामार्गावर भयंकर घडलं, कंटेनरचा ब्रेक फेल, ९ चारचाकींना उडवलं; घटना CCTVत कैद

Viral Social Media Post : ड्रग्ज पार्टीनंतर न्यूड पार्टीचे आमंत्रण, इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे वाद, नेमकं प्रकरण काय आहे?

SCROLL FOR NEXT