Hans Mahapurush Rajyog saam tv
राशिभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु बृहस्पति बनणार ‘हंस महापुरुष राजयोग’, 3 राशींना मिळणार मनासारख्या गोष्टी

Hans Mahapurush Rajyog: ग्रहांचे राजा गुरु जेव्हा आपल्या स्वगृही किंवा उच्च राशीत प्रवेश करतात आणि कुंडलीतील केंद्रस्थानी (१, ४, ७, १०) असतात, तेव्हा 'हंस महापुरुष राजयोग' तयार होतो. हा राजयोग पंच महापुरुष योगांपैकी एक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीमध्ये प्रवेश करतात. ज्योतिष्य शास्त्रामध्ये पंच महापुरुष राजयोगाचा उल्लेख आहे. हे हंस, मालव्य, शश, भद्र आणि रुचक आहेत. आज या आर्टिकलमध्ये गुरु बृहस्पतिने निर्माण केलेल्या हंस राजयोगाबद्दल बोलणार आहोत.

ऑक्टोबरमध्ये बृहस्पति आपल्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हंस महापुरुष राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग १२ वर्षांनी तयार होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

हंस महापुरुष राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला असं वाटणार आहे की, तुमच्या आयुष्यात आनंद दार ठोठावणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल.

तूळ रास

हंस राजयोगाची निर्मिती तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. नवीन करार आणि नफ्याच्या संधी मिळणार आहे. तुमची लोकप्रियता वाढणार आहे.

कन्या रास

हंस राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी उत्पन्नाच्या बाबतीत शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकणार आहे. कन्या राशीचे लोक वेगवेगळ्या व्यवहारांच्या मदतीने भरपूर नफा कमवू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT