राशिभविष्य

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Nakshatra transit Sun and Ketu: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि नक्षत्रांमधील त्यांचे प्रवेश हे मानवी जीवनावर मोठे परिणाम करतात. काहीवेळा असे दुर्मिळ योग जुळून येतात, जे शंभर वर्षांतून एकदाच घडतात, आणि त्यांचे परिणाम खूप शक्तिशाली मानले जातात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह राशींसह नक्षत्रांमध्ये भ्रमण करतात आणि नक्षत्रांमध्ये बदल करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसंच जगावर दिसून येतो. येत्या काळात ग्रहांचा राजा सूर्य आणि छाया ग्रह केतू एकाच दिवशी नक्षत्र बदलणार आहेत.

सूर्य-केतूचा नक्षत्र परिवर्तन ०६ जुलै रोजी होणार आहे. सूर्य ६ जुलै रोजी १०० मिनिटांनी पुनर्वसु नक्षत्रात भ्रमण करणार आहे. केतू ६ जुलै रोजीच पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

सिंह रास

सूर्य आणि केतुच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. नफा मिळविण्याचा आणि नवीन योजना राबवण्याचा हा काळ आहे.

कुंभ रास

सूर्य आणि केतुच्या नक्षत्रातील बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. तुमचे संबंध सुधारण्यासाठी आणि नवीन संबंध सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असणार आहे. व्यावसायिक भागीदारीत नफा होणार आहे. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

मेष रास

सूर्य आणि केतुच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta Photos: रॉयल लूकमध्ये दिसली अभिनेत्री, फोटो पाहून सौंदर्याचं कराल कौतुक

Padmagad Fort History: सिद्दीला रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाण्यात बांधला हा जलदुर्ग; नेमका आहे तरी कुठे?

Tuesday Horoscope: मेषसह ४ राशींचा मानसिक ताण वाढेल! काहींवर पैशाचा पाऊस, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: जैन मुनी निलेशचंद्र यांचं उपोषण मागे, १५ दिवसानंतर घेतली माघार

Local Body Election : अजित पवार गट भाजप, शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत, धुळ्यात राजकारण तापणार

SCROLL FOR NEXT