Budhaditya and Lakshmi Narayan Yog saam tv
राशिभविष्य

Rajyog: 100 वर्षांनंतर हनुमान जयंतीला बनणार बुधादित्य-लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल, 3 ग्रहांची राहणार कृपा

Lakshmi Narayan Yog And Budhaditya Rajyog: १०० वर्षांनंतर असाधारण असा राजयोग तयार होणार आहे. या विशेष योगामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. विशेषतः आर्थिक घडामोडींमध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोगांची निर्मिती होते. यावर्षी हनुमान जयंती १२ एप्रिल रोजी आहे. या दिवशी सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे.

याशिवाय या दिवशी शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे राजयोग १०० वर्षांनंतर निर्माण होणार आहेत. राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी काही राशींना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहेत. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शेअर बाजारामध्ये चांगला आर्थिक फायदा मिळू शकेल.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग फायदेशीर ठरू शकणार आहेत. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकणार आहे. घरात काही वाद असतील तर ते मिटण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. कोर्टाच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे.

मिथुन रास

बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्मभावावर तयार होणार आहे. यावेळी बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT