Laxmi Narayan Rajyog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Yog: 1 वर्षानंतर मंगळ राशीत बनणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Laxmi Narayan Yog In May: येत्या मे महिन्यात काही राशी मालामाल होणार आहेत. याचं कारण म्हणजे लक्ष्मी नारायण योगाची १ वर्षानंतर मंगळ राशीत निर्मिती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने त्यांच्या राशीत बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोगांची निर्मिती होत असते. मे महिन्यात व्यवसायाचा कर्ता बुध आणि संपत्तीचा कर्ता शुक्र यांची युती होणार आहे. मेष राशीत हा योगायोग निर्माण होणार असून अशा परिस्थितीत, काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो.

शुक्र आणि बुध हे ग्रह लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती करणार आहेत. यावेळी काही राशींच्या आयुष्यात अचानक आनंद येणार आहे. तर काहींना त्यांच्या करियमध्ये चांगली संधी मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींचे अच्छे दिन येणार आहेत ते पाहूयात.

कर्क रास

लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकणार आहे. लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी फक्त फायदे मिळू शकणार आहेत. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन रास

लक्ष्मी नारायण राजयोगाच्या निर्मितीसह मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होणार आहे. तसंच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकाल.

मकर रास

लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या सुखसोयी वाढणार आहेत. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहणार आहे. याच्या मदतीने तुम्ही मोठे यश मिळवू शकता. आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीसाठीही हा काळ शुभ राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT