Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: 24 तासांनंतर बनणार शक्तीशाली नवपंचम राजयोग; सूर्य-मंगळाच्या कृपेने मिळणार पैसा

Navpancham Rajyog 2025: सूर्य आणि मंगळ लवकरच नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे. अवघ्या २४ तासांनी हा योग तयार होणार असून काही राशींना यावेळी चांगले दिवस येणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांचा राज सूर्य सध्या कुंभ राशीत आहे. यावेळी कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. सूर्य आणि मंगळ लवकरच नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे. अवघ्या २४ तासांनी हा योग तयार होणार असून काही राशींना यावेळी चांगले दिवस येणार आहेत.

८ मार्च रोजी म्हणजेच उद्या सकाळी १०:४० वाजता सूर्य आणि मंगळ एकमेकांपासून १२० अंशांवर असणार आहेत. ज्यामुळे नवपंचम राजयोगाची निर्मिती होतोय. यामुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे. यावेळी या तिन्ही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. नवपंचम राजयोग कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात झपाट्याने वाढ होणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठीही सूर्य आणि मंगळाचा नवपंचम राजयोग भाग्यवान ठरू शकणार आहे. जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाचा अचानक चांगले पैसे मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

सिंह रास

या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमच्या बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला भौतिक सुख मिळू शकतं. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची पूर्ण आशा आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT