Shani Gochar 2025 Saam Tv
राशिभविष्य

Vasant Panchami : उद्यापासून 'या' राशींसाठी सुवर्णसंधी! ३० वर्षांनी वसंत पंचमीला शनीच्या कृपेने दुर्मिळ राजयोग, धनवर्षाव होणार

Shash Mahapurush Rajyog: शनीमुळे यावेळी एक दुर्मिळ राजयोग तयार होणार आहे. तब्बल ३० वर्षांनी हा राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. तो सुमारे अडीच वर्ष एका राशीमध्ये राहतो. शनीमुळे यावेळी एक दुर्मिळ राजयोग तयार होणार आहे. तब्बल ३० वर्षांनी हा राजयोग तयार होणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वसंत पंचमीचा सण २ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. यावर्षी शनिदेव वसंत पंचमीच्या दिवशी दुर्मिळ योगायोग घडवणार आहेत. शनिदेव 30 वर्षांनंतर शश राजयोग तयार करणार आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

शश राजयोगाची निर्मिती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येणार आहे. व्यावसायिकांना मोठा व्यवसाय करता येणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला फायदा होणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम असणार आहे.

वृषभ रास

शश राजयोगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजना बनवू शकाल आणि यश मिळवू शकाल. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता.

मकर रास

शश राजयोगाची निर्मिती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला कर्जाचे पैसेही मिळू शकतात. तुम्ही दीर्घकाळापासून ज्या समस्यांना तोंड देत आहात त्यापासून तुम्हाला आराम मिळू शकणार आहेत. मनात एक वेगळाच आनंद राहील. तसेच, या काळात तुमचा संवाद सुधारेल. ज्यामुळे लोक प्रभावित होतील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maida Effects on Health: जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ खल्ल्याने शरिरात कोणते बदल होतात?

छत्रपती शिवाजी महाराजांचा नजरकैदेतून सुटून पेटाऱ्यातून पळण्याचा संपूर्ण प्लॅन काय होता?

Kurkurit Mirchi Recipe: वडापावच्या गाडीवर मिळणारी बेसनातली कुरकुरीत मिरची घरी कशी बनवाल?

Maharashtra Government: जमिनीच्या वापरासंदर्भात ऐतिहासिक निर्णय, NA परवानगीमधील 'ही' अट्ट रद्द

Santa claus: सांताक्लॉजचं खरं नाव माहितीये काय?

SCROLL FOR NEXT