Homing Pigeon 
एक्स्क्लुझिव्ह

गडचिरोली जिल्हा सीमेलगत संशयास्पद कबुतर

सरकारनामा ब्युरो

चंद्रपूर : गडचिरोली Gadchiroli जिल्हा सीमेलगत छत्तीसगड राज्यात कोंडागांव जिल्हा परिसरात संशयास्पद कबुतर Homing Pigeon जप्तीने खळबळ उडाली आहे. या जप्त कबुतराच्या पायात सांकेतिक भाषेच्या चिठ्ठ्या आढळल्या आहेत. यातील सांकेतिक भाषेचे साऊथ इंडिया कनेक्शन असल्याचे प्राथमिक निष्पन्न झाले आहे. Suspicious Homing Pigeon Found in Chandrapur

पोलिसांनी कबुतराला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. सांकेतिक भाषेत चिठ्ठी लावलेला कबुतर आढळल्याने नक्षली Naxal संवेदनशील भागात नव्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. तपासात हे परदेशी कृत्य आहे की नक्षलवाद्यांकडून टेहळणी, हे स्पष्ट  होणार आहे. पोलीस दबावामुळे नक्षलवाद्यांनी साथीदारांना संदेश पोचविण्यासाठी असा प्राचीन पद्धतीचा अवलंब केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कबुतरांना प्रशिक्षित करणे तुलनेने सोपे असल्याचे पूर्वापार समजले जाते. ही जप्त केलेली  रेसिंग होमर नामक कबूतराची जात वेगवान रीतीने लक्ष्यापर्यंत पोचून परत येण्यासाठी प्रसिध्द आहे. पोलीस घटनेचा बारकाईने तपास करत आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: 'जरांगेंच्या बैठका सरकार पुरस्कृत, आमदाराने दिले १० ते १५ लाख'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Shirdi News: शिर्डी ट्रस्टचे कोट्यवधी उत्पन्न, तरीही लाडू प्रसाद महाग, साईभक्तांचा संताप|VIDEO

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT