Tula Shikvin Changlach Dhada  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tula Shikvin Changlach Dhada: यळकोट यळकोट जय मल्हार! अक्षराला उचलून घेऊन अधिपती चढणार जेजुरीगड, लवकरच संसाराला करणार सुरूवात

Tula Shikvin Changlach Dhada New Promo: लग्नानंतर अक्षरा आणि अधिपती जेजुरीतील खंडोबाच्या दर्शनासाठी जाणार आहे.

Priya More

Zee Marathi Serial:

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) या मालिकेने अल्पावधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळे अक्षराची भूमिका तर ऋषिकेश शेलार हा अधिपतीची भूमिका साकारत आहे.

नुकताच मालिकेमध्ये अक्षरा आणि अधिपतीचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर आता ही जोडी जेजुरीतील खंडोबाच्या दर्शनासाठी जाणार आहे. या मालिकेमध्ये लवकरच जेजुरी विशेष भाग रंगणार आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या नवीन भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो सोशल मीडिया आणि टीव्हीवर दाखवला जात आहे. अधिपती म्हणजे ऋषिकेश शेलारने आपल्या अधिकृत इन्साग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अधिपती आणि अक्षरा जेजुरीमध्ये असल्याचे दिसून येत आहे. अधिपती अक्षराला उचलून घेऊन जेजुरीगड चढत असल्याचे दिसत आहे.

या मालिकेच्या शूटिंगसाठी हे कलाकार खरंच जेजुरीला गेले होते. शिवानी रांगोळेने इन्स्टाग्रामवर खंडोबाच्या मंदिरातील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये शिवानी पारंपारिक वेशभूषेत म्हणजेच निळ्या रंगाच्या नववारी साडीमध्ये दिसत आहे. शिवानीने कपाळावर भंडारा लावला आहे. हा फोटो शेअर करत शिवानीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'येळकोट येळकोट जय मल्हार!.' 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा जेजुरी विशेष भाग प्रेक्षकांना 18 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे.

महत्वाचे म्हणजे, लग्न ठरल्यापासून ते लग्न झाल्यानंतरही अक्षरा आणि अधिपती यांना अनेक अडचणी येत आहेत. लग्नसोहळा पार पडल्यानंतर आता खंडोबाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर देखील त्यांना काय समस्यांचा सामना करावा लागणार हे येत्या भागामध्ये कळेल. दिवसेंदिवस या मालिकेचा प्रत्येक भाग खूपच रंजक होत चालला आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची पसंती वाढत चालली आहे. या मालिकेमध्ये दाखवले जाणारे ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे मालिकेच्या प्रत्येक नव्या भागाची ते आतुरतेने वाट पाहत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

वाढत्या प्रदूषणाचा थेट मेंदूवर हल्ला; मुंबईकरांचा श्वास गुदमरला, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT