Nava Gadi Nava Rajya Serial  Saam TV
मनोरंजन बातम्या

Nava Gadi Nava Rajya: जुन्या गडीसोबत रंगणार नवा खेळ, 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत पुन्हा होणार रमाची एन्ट्री

Nava Gadi Nava Rajya Serial: 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत पुन्हा रमाची एन्ट्री होणार आहे. रमाच्या चाहत्यांसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट असणार आहे.

Priya More

Zee Marathi Serial:

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेला (Nava Gadi Nava Rajya Serial) प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या ट्विस्टमुळे ही मालिका सातत्याने चर्चेत असते. या मालिकेमध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. या मालिकेमध्ये जुन्या गडीसोबत नवा खेळ रंगणार आहे. कारण 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत पुन्हा रमाची एन्ट्री होणार आहे. रमाच्या चाहत्यांसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट असणार आहे.

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतील आनंदी आणि रमा या एकमेकंकीच्या सवती दाखवण्यात आल्या आहेत. पण नंतर त्या मैत्रिणी होतात. एकमेकीसाठी त्या उभ्या देखील राहिल्या. दोघींनी देखील एकमेकींचे अस्तित्व जपले. आनंदीच्या सुखी संसारासाठी अचानक रमा निघून गेल्याचे मालिकेमध्ये दाखवण्यात आले होते. पण आता हिच रमा आनंदीसाठी पुन्हा येणार आहे. मालिकेमध्ये आता पुन्हा रमाची एन्ट्री होणार असल्यामुळे प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत.

पण एका दुसऱ्या जगात असणाऱ्या रमाला साक्षात चित्रगुप्त भूतलावर परत यायची परवानगी देणार का? त्यासाठी रमाला काही अटी घातल्या जातील का? या सर्व प्रश्नांची उतरं लवकरच मालिकेतून उलगडणार आहेत. आता जुन्या गडीसोबत रंगणारा नवा खेळ तुम्हाला लवकरच या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ही मालिका आता तुम्हाला नवीन वेळेमध्ये म्हणजे रात्री ८.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहे. या मालिकतील अभिनेता कश्यप परुळेकर, अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अनिता दाते हे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेच्या वेळेमध्ये नुकताच बदल झाले. ही मालिका ३९१ एपिसोड पूर्ण करून २१ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT