Sanjay Raut On Narayan Rane Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sanjay Raut In Khupte Tithe Gupte: ...तर नारायण राणेंची खासदारकी जाऊ शकते; संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Narayan Rane: अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागात संजय राऊत हजेरी लावणार आहेत.

Chetan Bodke

Sanjay Raut On Narayan Rane: झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक महत्वाच्या आणि मोठमोठ्या चेहऱ्यांनी उपस्थिती लावली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हा शो अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरला आहे. गेल्या आठवड्यात या शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हजेरी लावली होती. या शो मध्ये त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता या आठवड्यात अवधूत गुप्तेच्या स्पेशल शोमध्ये संजय राऊत हजेरी लावणार आहेत.

मागच्या भागात नारायण राणेंनी अवधूत गुप्तेच्या सर्वच प्रश्नांना रोखठोक आणि दिलखुलास पद्धतीने उत्तर दिले. यावेळी नारायण राणेंनी संजय राऊत यांचं मतदार यादीत नाव नसतानाही आपण खासदार केलं, असा दावा केला आहे. २००४ मध्ये राऊत पहिल्यांदा राज्यसभेवर गेले, त्यावेळचा किस्सा ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये राणेंनी सांगितला होता.

नारायण राणे म्हणाले होते, “एकदा एका संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी मला मातोश्रीवर बोलावलं होतं. दुसऱ्या मजल्यावर मी गेलो, त्यावेळी तिथे बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत बसले होते. मला बाळासाहेब म्हणतात, आपल्याला याला खासदार बनवायचा आहे. फॉर्म भरुन टाक.”

पुढे नारायण राणे म्हणाले होते, “मी संजय राऊतांना दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्र घेऊन माझ्या ऑफिसमध्ये यायला सांगितलं होतं. सांगितल्याप्रमाणे ते आले सुद्धा, मी पाहिलं तर त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नव्हतं. पण बाळासाहेबांनी दिलेला शब्द माझ्यासाठी नेहमीच अखेरचा असायचा. मी अधिकाऱ्यांना माझ्याप्रमाणे काय सांगायचं ते सांगितलं आणि संजय राऊत यांच्या खासदारकीचा फॉर्म भरला. फॉर्म छाननीच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय राऊतांचं नाव घेतलं. लगेचच काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी हात वर केला आणि मी म्हटलं, दाजी प्लीज. पुढे कोणाचं ऑब्जेक्शन नको. म्हणून संजय राऊत यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला.” हा किस्सा नारायण राणेंनी शेअर केला होता.

दरम्यान, आता या कार्यक्रमाच्या आगामी भागाचाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये नारायण राणेंनी लावलेले सर्वच आरोप खासदार संजय राऊत यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

नारायण राणेंचे आरोप फेटाळताना संजय राऊत म्हणाले, “नारायण राणे खोटे बोलत आहेत, मी माझा मतदार नोंदणी क्रमांक दिलेला आहे. या वक्तव्यावर त्यांचीच खासदारकी जाऊ शकते.”

दरम्यान, नुकताच झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर येत्या २५ जून रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडचा टीझर शेअर केलेला आहे. नेहमीच बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांनी चर्चेत राहणारे संजय राऊत या शो मध्ये येणार असल्याने सर्वांनाच नेमके ते या शो मध्ये काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT