you have never seen such a formidable entry of Udayanraje Bhosale watch video Saam Tv
मनोरंजन बातम्या

उदयनराजे भोसलेंची अशी जबरदस्त एन्ट्री कधीच पाहिली नसेल, आकाशातून बाईकवर...(पहा Video)

Udyanraje Bhonsle Viral Video: सिद्ध लोकप्रिय मराठी कॉमेडी शो, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) यामध्ये ते आले होते. यावेळी स्टेजवर त्यांनी थेट हवेत लटकलेल्या बाईकवरुन एन्ट्री घेत पुष्पा स्टाईलनं उपस्थितांची मनं जिंकली.

साम टिव्ही

सातारा: भाजप खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या आगळ्या - वेगळ्या स्टाईलनं नेहमीच चर्चेत असतात. राज्यभरात त्यांच्या स्टाईलचे चाहते हे त्यांना आपले आदर्श मानतात गाड्यांचा नंबर 007 (जेम्स बॉन्ड), हटके स्टाईल, डायलॉगबाजी, कॉलर अन् बरंच काही उदयनराजेंना (Udyanraje Bhonsle) एका राजकारणाच्या पलिकडचं एक वेगळं व्यक्तीमत्व बनवतं. त्यामुळं राजेंचा नादच खुळा असं बोलणं वावगं ठरणार नाही. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ते स्वतः चक्का बाईकवर बसुन हवेतून त्यांनी ग्रॅंड एन्ट्री (Grand Entry) घेतली. प्रसिद्ध लोकप्रिय मराठी कॉमेडी शो, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) यामध्ये ते आले होते. यावेळी स्टेजवर त्यांनी थेट हवेत लटकलेल्या बाईकवरुन एन्ट्री घेत पुष्पा स्टाईलनं उपस्थितांची मनं जिंकली. (you have never seen such a formidable entry of Udayanraje Bhosale watch video)

हे देखील पहा -

उद्यनराजेंच्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday Udyanraje Bhosnle) शहरात गेल्या 4 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातयं. याचाच एक भाग म्हणून झी मराठी या वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुष्पा (Pushpa) या चित्रपटातील गाण्यावर बाईकवरून अनोखी एन्ट्री मारली. चला हवा येऊ द्या या शोचे होस्ट डॉ. निलेश साबळे यांनी उदयनराजेंना 'पुष्पा' सिनेमातील डायलॉग सादर करण्याची विनंती केली. उदयनराजेंनीही 'पुष्पा झुकेगा नहीं साला' असा डायलॉग मारुन आपली अनोखी शेली दाखवून दिली.

दरम्यान आज २४ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस असून आज साताऱ्यात ते मोठी घोषणा करणार आहे. याबाबत त्यांनी कालच एक परिपत्रकाद्वारे माहिती दिली होती. साताऱ्यातील गांधी मैदानावर आज (२४ फेब्रुवारी) संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ते याबाबत घोषणा करणार आहेत. या पत्रकात त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. पण नेमकं काय केलं जाणार आहे, याची मात्र उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT