Yo Yo Honey Singh Dating Rumourous Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saiyaan Ji Rapper हनी सिंहला मिळाली सजनी.. कोण आहे ही मिस्ट्री गर्ल ?

रॅपर हनी सिंग अभिनेत्री टिना थडानीसोबत ब्रेक अपनंतर पुन्हा प्रेमात पडलाय. यो यो च्या आयुष्यात एका स्पेशल गर्लची एन्ट्री झालीये. कोण आहे ही मिस्ट्री गर्ल जाणून घेऊया..

Shweta Joshi

यो यो हनी सिंग अभिनेत्री टिना थडानीसोबत ब्रेक अपनंतर पुन्हा प्रेमात पडलाय. यो यो च्या आयुष्यात एका स्पेशल गर्लची एन्ट्री झालीये. विशेष म्हणजे गेल्या एका वर्षापासून तो रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. कोण आहे ही मिस्ट्री गर्ल जाणून घेऊया..

Saiyaan Ji Rap song ने चाहत्यांच्या मनावर वर राज्य करणारा यो यो हनी सिंहला खऱ्या आयुष्यात सजनी मिळाली आहे. पंजाबी एक्ट्रेस हीरा सोहलला हनी सिंह सध्या डेट करतोय. होळीच्या दिवशी हीरा हनीसोबत एकत्र कॉन्सर्टमध्येही दिसली होती. हीरा ने या आधी अजय देवगणच्या Thank God ह्या सिनेमात काम केलयं. हिराला पंजाबची मलायका अरोराही म्हणलं जातं.

'बुहारत हीरे दी', 'प्यार है ड्रामा', 'विक्टोरिया एक रहस्य' तिचे काही गाजलेले सिनेमे आहेत. सोशल मिडियावर हिरा खूप एक्टिव्ह असते. तिचे गॅल्मरस फोटेज् टाकून चाहत्यांना घायाळ करते. हिरा-हनी गेल्या एका वर्षापासून डेट करताय. जून महिन्यात रोमॅन्टिक हॉलिडे सुद्धा हे दोघे गेले होते अशी चर्चा आहे. हनी सिंह नेहमीच आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिलीये.

यो यो हनी सिंहची गाणी म्हणजे तरूणांसाठी एक प्रकारे नशाच... यो यो त्याच्या गाण्यातील लिरिक्समुळे अनेकदा ट्रोल होत असतो. त्याच्या करिअरमध्ये यो यो ने आतापर्यत अनेक चढ-उतार पाहिलेत. मात्र करिअरप्रमाणेच त्याचं पर्सनल लाईफही वादग्रस्त राहिलीये.

2011 मध्ये हनीने शालिनी तलवारसोबत लग्न केलं होतं. मात्र 2022 ला दोघांचा घटस्फोट झाला. शालिनीने Domastic violence आणि extra marital affairsचे आरोप हनीवर लावले होते. शालिनीला 1 कोटींची पोटगी हनीला द्यावी लागली होती. त्यामुळे हनी चांगलाच चर्चेत आला होता.

त्यानंतर अभिनेत्री - मॉडेल टिना थडानीसोबत हनी रिलेशनशीपमध्ये आला. मात्र हे रिलेशन देखील फार काळ टिकू शकलं नाही. 2022 ला त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. आता हनी-हिराच हे रिलेशन पुढे कसं वळण घेतं हेच पाहायच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

आज राजीनामा द्या अन् उद्या पीएफ काढा; EPFO चे कोणते नियम बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT