Honey Singh Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Honey Singh Divorce: घटस्फोटानंतर पत्नीला हनी सिंग देणार एवढी मोठी रक्कम!

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला.

Shivani Tichkule

मुंबई - प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगने (Honey Singh) शुक्रवारी अधिकृतपणे पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला आहे. दिल्लीतील (Delhi) साकेत जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर हनी सिंग आणि शालिनीच्या घटस्फोटाच्या बातम्यांना दुजोरा मिळत आहे. यासोबतच हनी सिंग शालिनी तलवारला एक कोटी रुपये पोटगी म्हणून देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

गुरुवारी न्यायालयात हनी सिंग आणि शालिनी तलवार प्रकरणाबाबत प्रदीर्घ सुनावणी झाली. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांचा हंगाम झाला. यानंतर यो यो हनी सिंगने शुक्रवारी अधिकृतपणे पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला आहे. मात्र, शालिनीने हनी सिंगकडे पोटगी म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. दोघांच्या परस्पर संमतीनंतर शालिनी तलवारला 1 कोटी रुपये पोटगी म्हणून देण्यात येणार आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च 2023 रोजी होणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार हिने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप दाखल केला होता. शालिनीने सोशल मीडियावर शालिनीने दावा केला होता की हनीने तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले होते. त्याचवेळी हनीने आपली फसवणूक करून पैसे घेतलाच दावा केला होता. हनी सिंगने हे सर्व आरोप खोटे फेटाळून लावले होते.

हनी सिंगने सांगितले होते की, त्याची पत्नी त्याच्यावर लावत असलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा विवाह 2011 मध्ये झाला होता. शालेय जीवनापासून दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. हनी सिंग आणि शालिनी तलवार जवळपास 20 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहर काँग्रेसमध्ये १२ वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत

Ashok Kharat: पतीचा मृत्यू अटळ आहे, भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण; खरातविरोधात आणखी ११ महिलांची तक्रार

Skymet Weather : स्कायमेटनं वाढवलं शेतकऱ्यांचं टेन्शन, यंदा मान्सून दडी मारणार, अहवालात काय आहे?

Morning Yoga Poses: सकाळी हे 5 योगा प्रकार केल्याने शरीर राहील फिट

Ambedkar Jayanti 2026 : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा! भीम जयंतीनिमित्त 'हे' प्रभावी भाषण नक्की करा; टाळ्यांचा कडकडाट होईल

SCROLL FOR NEXT