Lata Sabarwal Instagram
मनोरंजन बातम्या

Lata Sabarwal: दयाबेननंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्रीला झालाय घशाचा आजार...

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री लता सबरवाल एका गंभीर आजाराचा सामना करत आहे.

Chetan Bodke

Lata Sabarwal: टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री लता सबरवाल एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. याकडे दूर्लक्ष केल्यास अभिनेत्री तिचा आवाज कायमचा गमावू शकते. २००९ मध्ये टेलिव्हिजनवर प्रदर्शित झालेली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे ती बरीच चर्चेत आली आहे. लता सबरवालने मालिकेत हिनाच्या आईचे पात्र साकारले होते. सध्या आपल्या हेल्थमुळे लता सबरवाल चांगलीच चर्चेत आली आहे.

मालिकेत लता सबरवालने राजश्री या भूमिकेत झळकत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेतूनच लता सबरवाल यांना नवी ओळख मिळाली. या मालिकेतून त्यांना एक वेगळीच ओळख आपल्या चाहत्यांमध्ये मिळाली होती. पण गेल्या काही कारणामुळे त्या मालिकेपासून दुर गेल्या आहे, अनेक काही दिवसांपासून त्या आपल्या आवाजामुळे मालिकेत दिसत नाही. सोशल मीडियावर पोस्ट करत, त्यांनी मालिकेचा निरोप देखील घेत असल्याची घोषणा केली होती.

लता सबरवालने सोशल मीडियावर आपल्याला झालेल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे, नुकताच लता यांना घशाच्या एका गंभीर आजाराचे निदान झाले आहे. जर निदान आजारावर लवकरात लवकर निदान झाले नाही, तर त्यांना आपला आवाज सुद्धा गमवण्याची भिती व्यक्त केली आहे. सध्या लता सबरवाल त्यांच्या आजारामुळे चर्चेत आहेत.

पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थाना केली आहे. लता सबरवाल पोस्ट करत म्हणतात, ‘नुकताच मी घशाच्या आजारासाठी ENT तज्ज्ञांची भेट घेतली. माझ्या घशात गाठ आली आहे. प्रकृती स्थिर होण्यासाठी जवळपास १ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.’

पुढे लता सबरवाल म्हणतात, ‘मी माझ्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी सतत औषध घेत आहे. जर मी योग्य काळजी घेतली नाही, तर माझा आवाजही जाण्याची शक्यता आहे. तरी ही माझ्या लाडक्या चाहत्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा...’असं म्हणत चाहत्यांकडे विनंती केली आहे.

लता सबरवाल यांनी पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत लता सबरवाल यांनी प्रकृतीची काळजी घ्या असं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT