Ali Merchant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ali Merchant: तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता, या मॉडेलशी बांधली लग्नगाठ

Ali Merchant Marriage : अली मर्चंटने तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. गर्लफ्रेड अंदलीब जैदीशी त्याने लग्ननगाठ बांधली आहे.

Manasvi Choudhary

Ali Merchant Wedding News: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता अली मर्चंटने तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. गर्लफ्रेड अंदलीब जैदीशी त्याने लग्ननगाठ बांधली आहे.

38 वर्षाय अली मर्चंटने उत्तरप्रदेश येथील लखनऊमध्ये जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियाच्या उपस्थितीत मोठ्या शाहीथाटात अलीने शुक्रवारी 2 नोव्हेंबर 2023 रोजी अंदलीब जैदीशी लग्न केलं आहे.

सोशल मीडियावर अली मर्चंटने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. कॅमेऱ्यामध्ये रोमॅन्टिंक पोझ देताना दोघेही आनंदात दिसत आहेत. अलीने क्रिम कलरची शेरवानी परिधान केली आहे. तर ब्रायडल लूकमध्ये अंदलीबही अत्यंत सुंदर दिसत आहे.

"आता आम्ही कायमचे हँग आउट करू शकतो, आनंदाने कधीही ताऱ्यानंतर. मला तुझ्याबरोबर हसायला, रडायला आणि तुझी काळजी घ्यायला आवडेल. आता मी तुझ्यासोबत धावू शकतो, चालू शकतो, आणि तुझ्याबरोबर जगणार आहे. मी माझे उर्वरित आयुष्य ज्याच्यासोबत घालवणार आहे ती व्यक्ती तुच आहेस... माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. या कॅप्शनसह अलीने पोस्ट शेअर केली आहे.

कोण आहे अंदलीब जैदी

अली मर्चंटने लग्न केलेली अंदलीब जैदी एक मॉडेल आहे. एका फॅशन शो दरम्यान या दोघांची ओळख झाली. सुरूवातील दोघांमध्ये मैत्री झाली यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाली.मागील एक वर्षापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. अखेर हे दोघे शुक्रवारी लग्नबंधनात अडकले.

यापूर्वी अली मर्चंटचे चे दोन लग्न झालेत. अलीचे पहिले लग्न टिव्ही अभिनेत्री सारा खानसोबत झालं. दोन महिन्यातच हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर त्याचे दुसरे लग्न अनम मर्चंटसोबत झाले ते देखील फार काळ टिकलं नाही.नुकतेच अली गर्लफ्रेंड अंदलिब जैदीशी विवाहबंधनात अडकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT