Yami Gautam Viral Video Google
मनोरंजन बातम्या

Yami Gautam Viral Video: यामी गौतम प्रेग्नंट? पतीसोबत बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

Yami Gautam Pregnant: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स अंदाज लावत आहेत की, अभिनेत्री प्रेग्नंट आहे. व्हिडिओमध्ये यामी तिचा बेबी बंप लपवताना दिसतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yami Gautam Hide Baby Bump

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिच्याबद्दल एक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यामी तिच्या पतीसोबत आहे. ती तिचा बेबी बंप लपवताना दिसत आहे. तिने तिच्या ओढणीने तिचं पोट झाकलं होतं, जेणेकरून ते कॅमेऱ्यात दिसू नये. (latest entertainment news)

(Yami Gautam Viral Video) या चर्चेमध्ये कितपत तथ्य आहे, हे लवकरच समजेल. पण, सध्या इंटरनेटवर याची जोरदार चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत अभिनेत्रीच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा तिने अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

यामी गौतम (Yami Gautam) आणि तिचा पती आदित्य धर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये यामी मीडियासाठी पोज देताना दिसत आहे. पण त्याचवेळी ती तिचं पोट सारखं सारखं ओढणीने लपवत आहे. अभिनेत्रीला तिची प्रेग्नेंसी गुपित ठेवायची आहे, असं म्हटलं जातंय. पण यात कितपत तथ्य आहे, हे यामी स्वतःच सांगू शकेल. कारण त्यांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली (Yami Gautam Viral Video) नाही.

यामीच्या या व्हिडिओवर यूजर्सही जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ती आई होणार आहे असं दिसतंय. आणखी एका युजरने लिहिलंय की ती प्रेग्नंट आहे. तिसऱ्या यूजरने ती प्रेग्नंट असल्याचं लिहिलं आहे. दुसऱ्या युजरने लिहिलंय की, तू प्रेग्नंट आहेस का?

यामी गौतम ही इंडस्ट्रीतील जबरदस्त अभिनेत्री एक आहे. तिने तिच्या अभिनय कौशल्याने आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं चाहत्यांना वेळोवेळी प्रभावित (Yami Gautam Pregnant) केलंय. यामी गौतम आणि आदित्य धर या दोघांनी 2021 मध्ये एका लग्न केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chintamani Aagman 2025 : भक्तांची चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीचा फर्स्ट लूक; पाहा फोटो

Woman Health Care :प्रत्येक महिलेने हे ५ सूपरफूड खायलाच हवेत, वाचा काय काय फायदे होतील

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळजनक आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT