Khayali Saharan Latest News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khayali Saharan: स्टँड-अप कॉमेडिन ख्याली सहारनवर बलात्काराचा आरोप; पीडित महिलेने घेतली पोलिसांत धाव

राजस्थानच्या मानसरोवर पोलीस ठाण्यात प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन खयाली सहारनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chetan Bodke

Khayali Saharan: राजस्थानच्या मानसरोवर पोलीस ठाण्यात प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन खयाली सहारनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खयाली सहारनवर एका २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या आरोपांच्या आधारे जयपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉमेडियन खयाली सहारनने मद्यधुंद अवस्थेत एका महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्याने मानसरोवर परिसरातील एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे.

मानसरोवर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप यादव यांच्या माहितीनुसार, “महिलेच्या तक्रारीवरून विनोदी कलाकाराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.” घटनेच्या एका दिवसानंतर या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, “श्रीगंगानगर येथील रहिवासी असलेली पीडित महिला, गुटखा फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणार्‍या आणखी एका महिलेसह तिला नोकरी मिळवून देण्यासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी विनोदी कलाकाराच्या संपर्कात आली होती.”

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडितेने सांगितले की, “कॉमेडियन खयालीने मानसरोवर येथील हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. एक माझ्यासाठी आणि दुसरी दोन अन्य महिलांसाठी त्याने रुम बुक केल्या होत्या. तेव्हा खयालीने दारू प्यायली आणि महिलांनाही दारू पिण्यास भाग पाडले. त्यावेळी एक महिला खोलीतून निघून गेली आणि ख्यालीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केला. ”

ख्याली सहारन याने ग्रेट इंडियन चॅलेंज सीजन 2 मध्ये सहभाग घेतला होता. ‘द कपिल शर्मा शो’या शोमध्ये देखील ख्यालीने हजेरी लावली होती. ख्याली हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. शिवाय तो आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

LPG Supply: होर्मुझ स्ट्रेटमधून भारताकडे निघाले LPG चे दोन जहाज; थेट गुजरातला पोहोचणार गॅसचे टँकर

SCROLL FOR NEXT