Sangram Chougule SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sangram Chougule : आर्याने निक्कीला थोबाडीत मारली, त्याआधी नेमकं काय झालं होतं? संग्रामने सांगितला पडद्यामागचा घटनाक्रम

Nikki-Aarya Slap Fight : संग्राम चौगुले यांनी आर्याने निक्कीला थोबाडीत मारण्याच्या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. संग्राम नेमकं काय बोला जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चं (Bigg Boss Marathi ) पर्व महाराष्ट्रात खूप गाजत आहे. अनेकांच्या हे पसंतीस पडले आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. हे सीझन भांडणे, राडा यामुळे खूप गाजलेले आहे. या पर्वातील सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे आर्याने निक्कीला थोबाडीत मारले. या प्रकरणामुळे आर्याला 'बिग बॉस' च्या घरातून बाहेर जावे लागले. ज्यामुळे चाहत्यांनी खूप नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तिच्या या वर्तणूकीसाठी समर्थन केले. कारण निक्की अनेकांना आवडत नाही.

'बिग बॉस' घरात हा वाद झाल्यानंतर आर्याला बाहेर काढल्यावर प्रेक्षकांनी आर्याने निक्कीला थोबाडीत मारण्याचे फुटेज दाखवण्यास सांगितले. मात्र हा शो लहान मुलं देखील पाहतात. त्यामुळे हिंसात्मक दृश्य टीव्हीवर दाखवता येणार नाही असे म्हणतं 'बिग बॉस'ने तो व्हिडीओ दाखवला नाही. यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न निमार्ण केले. मात्र आता या प्रकरणावर बिग बॉस वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धक संग्राम चौगुलेने मोठा खुलासा केला आहे.

एका मिडिया मुलाखतीत संग्रामने (sangram chougule) सांगितलं की, "आर्याने निक्कीला थोबाडीत मारले त्यावेळी घरातल्या कॅप्टनचा निर्णय होणार होता. भांडण करताना दरवाजा बंद झाल्यामुळे निक्की (Nikki Tamboli) दरवाजा ढकलत होती. दरवाजा ढकलण्याच्या नादात निक्कीचा हात आर्याच्या गालाला लागला. यामुळे आर्याला वाटलं की तिला निक्कीने थोबाडीत मारलं. यामुळे पुढे आर्याने रागात निक्कीच्या थोबाडीत मारलं. आर्याने (Aarya Jadhao) निक्कीला खूप जोरात मारली होती. कारण त्याचा आवाज ऐकून मला आठवतंय की आम्ही ५० मीटरवरुन पळत आलो होतो. यानंतर सर्वांनी आर्याला विचारलं होत की, तू आधी मारलं की निक्कीने? यावर आर्या म्हणाली तिने मारलं म्हणून मी मारलं." असा खुलासा संग्राम चौगुलेनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात! जांभुळवाडी दरी पुलाजवळ दोन ट्रेलरची धडक

Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

SCROLL FOR NEXT