urmila matondkar birthday
urmila matondkar birthday  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urmila Matondkar Career : 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरची प्रवासाला का लागला ब्रेक, तिच्या आयुष्यात काय घडले 'त्या' वळणावरती

Pooja Dange

Why Urmila Matondkar Took Break From Movie: उर्मिला मातोंडकर ही ९० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त उर्मिलाने तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे. बॉलिवूडमध्ये 'रंगीला गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली उर्मिला मातोंडकरचा आज 49 वा वाढदिवस आहे.

उर्मिला मातोंडकरने चित्रपटांपासून लांब गेली आहे. आता उर्मिला राजकारणात खूप सक्रिय आहे. परंतु ९० च्या दशकात उर्मिलाने तिच्या अभिनयासोबतच डान्सनेही प्रेक्षकांना वेड लावले होते. जेव्हा जेव्हा 'रंगीला गर्ल' रुपेरी पडद्यावर नाचायची तेव्हा चित्रपटगृहात बसलेले प्रेक्षक तिच्यासोबत नाचायचे.

उर्मिलाच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा हिट चित्रपट देऊनही तिला काम मिळायचे बंद झाले होते. उर्मिला मातोंडकर नेहमीच कॉन्ट्रोवर्सीच्या केंद्रस्थानी असायची. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारी ही उर्मिला बीआर चोप्रा यांच्या 'कर्मा' या चित्रपटात पहिल्यांदा दिसली होती.

उर्मिला मातोंडकरने अनेक चित्रपटात काम केले आहे. पण राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर उर्मिलाने कधीही मागे वळून पाहिले नाही. 'रंगीला' सुपरहिट झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या प्रत्येक चित्रपटात दिसू लागली. राम गोपाल वर्माच्या जवळपास 13 चित्रपटांमध्ये उर्मिलाने काम केले आहे.

त्यावेळी राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या नात्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण राम गोपाल वर्मा हे आधीच विवाहित होते आणि जेव्हा या दिग्दर्शकाच्या पत्नीला या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा तिने या उर्मिलाचे आयुष्याच बदलून टाकले. मात्र, राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांनी त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही.

या वादानंतर राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्यातील संबंध बिघडले. राम गोपाल वर्मा इंडस्ट्रीतील मोठं नाव असल्याने उर्मिला मातोंडकरला चित्रपटात घेऊन कोणालाही त्याच्याशी वैर करायचं नव्हतं. त्यानंतर उर्मिलालाल चित्रपट मिळणे कठीण झाले. सुपरस्टार अभिनेत्री असलेली उर्मिला मातोंडकर इंडस्ट्रीतून गायब झाली.

उर्मिलाने प्रेमासाठी धर्म आणि लोकांची पर्वा न करता मोहसीन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसिन अख्तर मीर हा काश्मिरी व्यापारी आणि मॉडेल आहे. 'लक बाय चान्स' या चित्रपटातही तो दिसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kriti Sanon : क्रितूच्या मॅडनेसची बातच और आहे

Nashik Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी; पक्षातील बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष उमेदवारी अर्ज भरला

Heena Gavit : खोटे बोलून आदिवासी समाजाची दिशाभूल; डॉ. हिना गावित यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amaravati Water Crisis News | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

Narendra Modi: अमेठीत पराभव दिसला, राजपुत्र थेट रायबरेलीत पळाला; PM मोदींचा राहुल गांधींना टोला

SCROLL FOR NEXT