The Kapil Sharma Show To Go Off The Air Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kapil Sharma Show: कपिल शर्माचा कॉमेडी शो पुन्हा बंद होणार?; या दिवशी शेवटचा एपिसोड...

पिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे...

Chetan Bodke

The Kapil Sharma Show To Go Off The Air: ‘द कपिल शर्मा शो’ हा टेलिव्हिजन शो सर्वाधिक लोकप्रिय शो ठरला आहे. कपिल शर्माच्या या शोमध्ये अनेक बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत बडे स्टार्स हजेरी लावतात. कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्माला आता विश्रांती घ्यायची आहे. त्यामुळेच हा शो तात्पुरता बंद करण्याचा विचार करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोच्या टीआरपीच्या दृष्टीने प्रत्येक वेळी हंगामी ब्रेक घेणे ही चांगली बाब आहे. जेणेकरून शो मध्ये काहीतरी नवीन प्रयोग करु शकतात. शो सतत चालवल्यामुळे शो कंटाळवाणा होण्याची शक्यता देखील वाढते. म्हणूनच ब्रेक घेणे हा एक चांगला प्रयोग आहे. असं म्हणत शो चे निर्माते हा शो बंद करण्याचा निर्णय घेत आहेत.

या सीझनचा शेवटचा एपिसोड कधी येईल? यावर प्रतिक्रिया देताना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप अखेरची तारीख निश्चित झालेली नाही. पण निर्मात्यांनी केलेल्या तयारी प्रमाणे, मे महिन्याच्या अखेरीस शूट पुर्ण होणार आहे  त्यानंतर जूनपर्यंत हा सीझन संपेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

'द कपिल शर्मा शो' बंद होण्याचे एक कारण म्हणजे कपिल शर्माकडे अनेक आंतरराष्ट्रीय टूर लाइन-अप आहेत. त्याचं शेड्युल खूप व्यग्र आहे. अशा परिस्थितीत त्यालाही विश्रांतीची नितांत गरज असल्यामुळे, तो त्याच्या इतर वचनबद्धतेची पूर्तता करू शकेल. 'द कपिल शर्मा शो'चा नवा सीझन कधी येईल याची अद्याप माहिती नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT