Bigg Boss Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi: अंकिताला बाहेर पडण्याचं टेन्शन; बिग बॉसने कोकण हार्टेड गर्लला झापले, म्हणाला....

Bigg Boss Marathi Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाली आहे. अंकिताची मजेदार खेळी आणि कॅप्टनसी पाहण्यास मिळणार आहे.

Manasvi Choudhary

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवनवीन टास्क पार पडत आहे. दरम्यान स्पर्धकांमध्ये वाद, भांडण, आणि राडे पाहायला मिळतात.आजच्या एपिसोडमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाली आहे. अंकिताची मजेदार खेळी आणि कॅप्टनसी पाहण्यास मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अंकिता पॅडी दादा आणि आर्याला म्हणतेय,"मी हे विसरले की माझे टिंब टिंब मित्र आहे जे मला बघत असणार. बाहेर पडल्यावर ते मित्र मला ऐकवणार". त्यावर बिग बॉस म्हणतात,"अंकिता असं खेळायचंच कशाला? की टिंब टिंब मित्र काही बोलतील". त्यावर अंकिता म्हणतेय,"बिग बॉस मी चांगलंच खेळत आहे".

बिग बॉस नेहमीच पॅडी दादा आणि अंकिताबद्दल बोलत असल्याने डीपी दादांना मात्र याचं कौतुक वाटतं. पुढे बिग बॉस,"असं नको व्हायला की खेळ बघून मित्र टिंब टिंब म्हणतील". पुढे मालवणी भाषेत 'बिग बॉस' अंकिताला या आठवड्याचं कॅप्टनसीबद्दल बोलताना दिसत आहेत.

पॅडी दादा म्हणत आहेत,"लहानपणापासून पकडापकडी खेळताना कोणाच्या हाताला लागायचं नाही हा आपला फंडा आहे". त्यावर घरातील मंडळी पॅडी दादांचं त्यांच्या खेळाबद्दल कौतुक करताना दिसतात. अरबाज पॅडी दादांना म्हणतोय,"सोडायचं नाही हेच फक्त माझ्या डोक्यात होतं".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT