मराठी अभिनेत्र्या ओठावरची लिपस्टिक पुसत का म्हणतायत #BanLipstick ?  SaamTvnews
मनोरंजन बातम्या

मराठी अभिनेत्र्या ओठावरची लिपस्टिक पुसत का म्हणतायत #BanLipstick ?

सध्या सोशल मीडियावर बॅन लिपस्टिक (BanLipstick) हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय. त्याच कारण देखील तसंच आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्राजक्ता माळी यांनी 'बॅन लिपस्टिक' असा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सध्या सोशल मीडियावर बॅन लिपस्टिक (BanLipstick) हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतोय. त्याच कारण देखील तसंच आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला ज्या मध्ये ती म्हणतेय "मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक" तिच्या या व्हिडीओ नंतर तिच्या चाहत्यांसोबतच सगळेच बुचकळ्यात पडले. नेमकं काय झालं असावं असा सगळ्यांनाच प्रश्न पडला. त्यांनतर तेजस्विनी पंडित चा इंस्टाग्रामचा कमेंट बॉक्स अक्षरशः प्रश्नांनी, तर्कवितर्कांनी आणि विनोदी कमेंट्स ने भरला होता.

गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्राजक्ता माळी मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. या तिघींनीही अनेक मराठी चित्रपटांत जोरदार काम केले आहे. या तिघीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात अन् सतत काही ना काही शेयर करत असतात.

आताही या तिघींनी बॅन लिपस्टिक चा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत या तिघी स्वत:च्या ओठांवरील लिपस्टिक पुसत आहेत आणि Ban lipstick असे म्हणत आहेत. व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शन देताना माझे लिपस्टिकला समर्थन नाही 'बॅन लिपस्टिक' असे त्यांनी म्हटले आहे.

तेजस्विनी पंडितच्या या पोस्ट नंतर अभिनेत्री सोनाली खरे, अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघींनी देखील तेजस्विनी पंडितचे समर्थन करत, मी लिपस्टिक ला समर्थन करत नाही 'बॅन लिपस्टिक' असा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय नेमकं हे प्रकरण काय आहे?

हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर दिग्दर्शक संजय जाधव यांनी कमेंटमध्ये ‘क्या हुआ भाई?’ असा सवाल केला होता. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. काही जणांनी कमेंट केल्या आहेत कि, लिपस्टिक पुसायचीच होती तर लावलीच कशाला?, आता हे काय नवीन, असं ही, मास्क लावल्यावर लिपस्टिक कुठे दिसते? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे.

मात्र, तेजस्विनी, सोनाली आणि प्राजक्ता यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमागचा त्यांचा हेतू नेमका काय आहे? हे अद्यापही अस्पष्ट आहे. काही जणांनी एखाद्या आगामी चित्रपट किंवा नाटकाच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे.

मात्र, या तिघींनी हा व्हिडीओ नेमका कशासाठी पोस्ट केला आहे? याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. मात्र, त्यांचा हा व्हिडीओ प्रमोशनचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या सर्वच जण औत्सुक्याने यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यातील बोगस बियाणं व बोगस खताचा मुद्दा तापला

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

SCROLL FOR NEXT