Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'तून सदस्यांची कमाई किती? सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक कोण?

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' चा (Bigg Boss Marathi ) खेळ आता काही दिवसांचा उरला आहे. हा सीझन खूप गाजला. घरातील सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खूप राज्य केलं. यंदाच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या भागातील सदस्य आले होते. त्यातील फक्त 7 सदस्य शेवटच्या टप्प्यात पोहचले आहेत. यातील कोण 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यंदा बिग बॉसच्या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. मात्र यासाठी बिग बॉस घरातील सदस्यांना मानधन मिळाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार,कोणाला किती मानधन मिळाले आणि बिग बॉस घरातील सर्वात महागडा स्पर्धक (Highest Paid Contestant) कोण जाणून घेऊयात.

टॉप ७ स्पर्धकांनी बिग बॉस मराठीसाठी किती मानधन घेतले?

वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर यांना दर आठवड्याला 2.50 लाख रुपये मानधन देण्यात येते.

सूरज चव्हाण

सर्वांचा लाडका गुलीगत सूरजला आठवड्याला फक्त 25 हजार रुपये मानधन मिळत आहे.

धनंजय पोवार

बिग बॉस घरात आपल्या खेळाने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या धनंजय पोवारला दर आठवड्याला 60 हजार रुपये मानधन दिले जाते.

जान्हवी किल्लेकर

प्रत्येक टास्कमध्ये खूप खेळाडू वृत्तीने खेळणाऱ्या जान्हवी 1 लाख रुपये मानधन घेते.

अभिजीत सावंत

आपली मते रोखठोक मांडणारा गायक अभिजीत सावंत दर आठवड्याला 3.50 लाख रुपये मानधन घेतो.

अंकिता वालावलकर

सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीमध्ये दर आठवड्याला ५० ते ६० हजार इतकं मानधन घेते.

निक्की तांबोळी

बिग बॉस मराठी 5 गाजवणारी निक्की तांबोळी दर आठवड्याला 3.75 लाख रुपये मानधन घेते. निक्की या सीझनची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे.

बिग बॉस मराठीच्या इतर सदस्यांनी किती मानधन घेतलं?

अरबाज पटेल

आपल्या गेमने बिग बॉसचे 5 वे पर्व गाजवणारा अरबाज पटेलने दर आठवड्याला 1.25 लाख रुपये घेतले आहेत.

घनश्याम दरवडे

छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे यांनी 50 हजार रुपये आठवड्याला घेतले आहेत.

वैभव चव्हाण

बिग बॉसच्या घरातील वैभव चव्हाण याला दर आठवड्याला 70 हजार रुपये मिळाले.

पंढरीनाथ कांबळे

बिग बॉसच्या घरातील सर्वांचा लाडका पॅडी दादा दर आठवड्याला 2 लाख रुपये मानधन दिले जात होते.

आर्या जाधव

निक्कीला थोबाडीत वाजवणारी आर्या जाधवने 1 लाख रुपये दर आठवड्याला कमावले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT