Appacha Vishay Lay Hard Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Appacha Vishay Lay Hard Song: 'अप्पाचा विषय लय हार्ड' तुफान गाजणाऱ्या या गाण्याचे मूळ गीतकार कोण?

Appacha Vishay Lay Hard Hai Song Writer And Singer: सोशल मिडिया या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन गाणी ट्रेडिंगमध्ये आहेत. सध्या सोशल मीडियावर 'आप्पाचा विषय लय हार्ड आहे' या गाण्याने धुमाकूळ घातलाय.

Manasvi Choudhary

सोशल मिडिया या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन गाणी ट्रेडिंगमध्ये आहेत. सध्या सोशल मीडियावर 'आप्पाचा विषय लय हार्ड आहे' या गाण्याने धुमाकूळ घातलाय. कुटुंबामध्ये घरातील मोठ्या व्यक्तीला 'आप्पा' असे म्हणतात. यामुळेच आप्पाचा विषय़ लय हार्ड आहे म्हटंल्यावर लहानापासून मोठ्या मंडळीपर्यंत सर्वजण या गाण्यावर मजेशीर रिल्स बनवत आहेत. महिलादेखील हटके स्टाईलमध्ये या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं कसं झाला ट्रेंड?

इन्स्टाग्राम ओपन केल्यावर तुम्हाला 'आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचं बाहेर लय लाड आहे' हे गाणं ऐकायला मिळतं. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. परंतू हे गाणं कोणी गायलंय? या गाण्याचा मूळ गीतकार कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. तर आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

कोण आहे मूळ गाण्याचा गीतकार?

सोशल मीडियावर सध्या कन्टेट क्रिएटर,ब्लॉगर आणि रिलस्टार यांनी त्याचं वर्चस्व निर्माण केलं आहे. विविध माध्यमांद्वारे ते आपली माहिती,संदेश,लाईफस्टाईल विषयीची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. असाच एक युट्युबर म्हणजे वरदान. त्याने हे गाणं गायलं आहे. सोशल मिडिया युट्यूबवर त्याने हे गाणं पोस्ट केलय ज्याला नेटकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. एक महिन्यात या गाण्याला १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT