Salman Khan News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan News: काळवीटाच्या शिकारीची सलमानने खरचं दिली होती कबुली? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय? वाचा...

Salman Khan Viral Video: सलमान खानवर काळवीट शिकार केली होती की नाही, हे अद्यापही स्पष्ट झालं नाही. मात्र याशीच संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सलमान याने काळवीटाची शिकार केल्याची कबुली दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र सलमानने खरंच काळवीटाच्या शिकारीची कबुली दिली होती? या व्हायरल व्हिडिओमागचं नेमकं काय आहे सत्य? हेच आपण जाणून घेणार आहोत.

अलीकडेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्धिकी हे सलमान खान याचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं. सिद्धीकी यांच्या हत्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. काळवीट हे बिश्नोई समाजासाठी पूजनीय आहे. यातच हम सात, सात हैं चित्रपटादरम्यान सलमान खान याने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. याशीच संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सलमान काळवीटाची शिकार केल्याची कबुली देताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ खरा आहे का? याबाबत प्रश्न चिन्ह आहे.

काळवीटाची शिकार मी केली नव्हती, असं सलमानने या मुलाखतीत म्हटलं होतं. पुढे त्याने “हे प्रकरण खूप मोठं आहे. काळवीटाची शिकार करणारा मी नव्हतोच”, असं सांगितलं आहे. पण मी कोणाला काही बोलणार नाही, पुढे त्याला तू हे स्वतःवर का घेतलंस असं विचारल्यावर सलमान म्हणाला “आता काहीच अर्थ नाही” असं तो म्हणला.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार- मनोज जरांगे पाटील

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ३६८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Kidney Symptoms: किडनी खराब होण्याची ही सामान्य लक्षणे ओळखा आणि वेळीच व्हा सावध

'Bigg Boss 19'ची धमाकेदार सुरूवात; पहिल्याच दिवशी सदस्यांनी घातला तुफान राडा, पाहा VIDEO

Manoj Jarange : फडणवीस सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम, एकदा निघालो तर थांबणार नाही; मनोज जरांगेंची डरकाळी

SCROLL FOR NEXT