Akshay Kumar Troll Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Troll: अक्षय कुमार बनला भोजपुरी 'आयटम बॉय'; 'घिस घिस घिस' गाण्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंग, मीम्स तुफान व्हायरल

Akshay Kumar Troll: ‘वेलकम टू द जंगल’मधील ‘घिस घिस घिस’ गाण्यात अक्षय कुमारचा भोजपुरी ‘आयटम बॉय’ अवतार पाहून चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर गाण्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

Shruti Vilas Kadam

Akshay Kumar Troll: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत आला आहे. आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील ‘घिस घिस घिस’ हे नवे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्यात अक्षयचा भोजपुरी ‘आयटम बॉय’ अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत. गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

घिस घिस घिस’ या गाण्यात अक्षय कुमार पूर्णपणे भोजपुरी स्टारच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. रंगीबेरंगी सेट्स, विचित्र डान्स स्टेप्स आणि गंमतीशीर एक्सप्रेशन्समुळे हे गाणे चर्चेचा विषय ठरले आहे. या गाण्यात भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह हिच्यासोबत अक्षयची जोडी पाहायला मिळत आहे. दोघांची केमिस्ट्री आणि एनर्जी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गाण्याच्या सुरुवातीलाच परेश रावल यांचा एक संवाद प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधतो. ते म्हणतात, “एक असा हिरो आहे जो आधी टॉपचा हिरो होता, पण आता फ्लॉपचा हिरो आहे. भोजपुरीत आयटम बॉय बनून घिसत आहे.” त्यानंतर अक्षय कुमारच्या एंट्रीचा सीन दाखवण्यात आला आहे. हा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

या गाण्याला काही चाहत्यांनी मजेशीर आणि एंटरटेनिंग म्हटले आहे, तर काहींनी ते “ओव्हर द टॉप” आणि 'क्रिंज' अशा प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले, “अक्षय कुमार पवन सिंहची स्टाईल कॉपी करताना दिसतोय.” तर दुसऱ्याने म्हटले, “बॉलिवूडचे भोजपुरी इंडस्ट्री करणं थांबावा” तर आणखी एकाने लिहिले हिट होण्यासाठी अक्षय काहीही करत आहे.

वेलकम टू द जंगल हा लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि अनेक कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून, हा चित्रपट २६ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT