Shakira Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

'वाका वाका' फेम गायिका शकिरा इटलीत Anant - Radhika 2nd Pre Wedding गाजवणार, शकिराची संपत्ती पाहून डोळे फिरतील

Hollywood Star Shakira's Property: २८ मे ते १ जूनपर्यंत इटलीमध्ये क्रूझवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री- वेडिंग सोहळा आहे. या इव्हेंटमध्ये 'वाका-वाका' फेम शकिरा परफॉर्मन्स करणार आहे

Chetan Bodke

सध्या कोलंबियन पॉप सिंगर शकीरा कमालीची चर्चेत आली आहे. २८ मे ते १ जूनपर्यंत इटलीमध्ये क्रूझवर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री- वेडिंग सोहळा आहे. या प्री- वेडिंग इव्हेंटमध्ये वाका वाका फेम शकिरा परफॉर्मन्स करणार आहे. सध्या शकीराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच जाणून घेऊया शकीराच्या नेटवर्थबद्दल...

शकीरा सर्वाधिक फेमस २०१० मध्ये झाली. तिने फुटबॉल फिफा वर्ल्डकप 'वाका वाका' हे गाणे गात संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली. तिच्या एकाच गाण्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. शकिरा जगभरामध्ये टॉप गायकांच्या यादीमध्ये असून ती कोट्यवधींची मालकीण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शकीराकडे एकूण ३०० मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे. ती पेशाने गायिका, संगीतकार, गीतकार, डान्सर, कोरियोग्राफर, मॉडेल अशी बहुआयामी आहे. शकीराचा जगभरातल्या श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये समावेश होतो.

मीडिया रिपोर्टनुसार, शकिरा एक गाणं गाण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजते. शकिरा कोणत्याही खासगी इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी १० ते १५ कोटी रुपये मानधन घेते. पण अद्याप तिला किती मानधन मिळालं आहे, याबद्दलची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार शकीराला रिहानाप्रमाणेच मानधन मिळण्याची शक्यता आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा इटलीमध्ये चार दिवसांचा प्री- वेडिंग सोहळा पार पडणार आहे. प्री- वेडिंग इव्हेंटसाठी अख्खं बॉलिवूड उपस्थित राहणार असून चार दिवसांसाठी शुटिंगसह सर्वच कामं बंद राहणार आहे. प्री- वेडिंग इव्हेंटला ८०० मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

SCROLL FOR NEXT