prashant damle, vishnudas bhave gaurav padak puraskar  saam tv
मनोरंजन बातम्या

Prashant Damle : अभिनेते प्रशांत दामलेंना 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार जाहीर

vishnudas bhave gaurav padak puraskar : 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनी सांगलीत या पुरस्काराचे वितरण केले जाईल असेही कराळेंनी नमूद केले.

विजय पाटील

Sangli News : सांगली येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती यांच्यावतीने आज (मंगळवार) रंगभूमी क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले (vishnudas bhave gaurav padak puraskar declared to marathi actor prashant damle) यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमी दिनी सांगली येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समितीने साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शरद कराळे म्हणाले विष्णुदास भावे पदक पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना दिला जाणार आहे. गौरव पदक, 25 हजार रुपये रोख आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शरद कराळे म्हणाले रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आता पर्यंत बालगंधर्व पासून रोहिणी हट्टंगडी या व अशा मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज कलाकारांना विष्णूदास भावे गौरव पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दामले यांना 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनी सांगलीत या पुरस्काराचे वितरण केले जाईल असेही कराळेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT