Visakha Subhedars Son Saam Tv
मनोरंजन बातम्या

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मुंबईत परतला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला अखेर मायदेशी परत आणण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

Shruti Vilas Kadam

Visakha Subhedars Son: मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय कुवेतमध्ये अडकल्याची घटना काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. मात्र आता मोठ्या प्रयत्नांनंतर अभिनय मायदेशी सुखरूप परतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे आणि विशेष प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

काही दिवसांपूर्वी विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपला मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला असल्याचं सांगत मदतीची विनंती केली होती. अभिनय लंडनला जात असताना कुवेत येथे त्याचा लेओव्हर होता. मात्र मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि उड्डाणे रद्द झाल्यामुळे तो कुवेतमध्ये अडकून पडला होता.

या घटनेनंतर विशाखा सुभेदार यांनी भारत सरकारकडे तसेच महाराष्ट्रातील नेत्यांकडे मदतीची आर्त विनंती केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांना सोशल मीडियावर टॅग करत मुलाला सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या व्हिडिओनंतर अनेक चाहत्यांनीही पाठिंबा दिला.

दरम्यान, मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक विमानं रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अनेक भारतीय नागरिकही त्या भागात अडकले होते. अभिनयसह अनेक प्रवाशांची काही काळ हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिस्थिती गंभीर असल्याने कुटुंबीयांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र अखेर महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे अभिनय सुभेदार सुरक्षितपणे भारतात परतला आहे. या मदतीबद्दल विशाखा सुभेदार यांनी सरकारचे आभार मानले. मुलगा सुखरूप घरी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT