Virender Sehwag Enjoyed Watching Pathan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virender Sehwag On Pathan: सेहवागच्या 'पठान'वरील पोस्टवर नेटकरी भडकले, अनेकांनी तर वीरुला Unfollowच केलं

वीरेंद्र सेहवागने 'पठान' चित्रपटाचा व्हिडिओ त्याच्या स्टोरीवर शेअर केला आहे.

Pooja Dange

Virender Sehwag Share Post On Pathan: शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आलेल्या शाहरुखच्या या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 'पठान'मुळे बॉलिवूड चित्रपटाला चांगले दिवस पाहायला मिळत आहते.

शाहरुखच्या 'पठान' चित्रपटाचे कौतुक प्रेक्षकसह समीक्षकांनी देखील केले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी 'पठान'चे कौतुक करत त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. आता क्रिकेट जगतातील दिग्गजांनी देखील 'पठान'चे कौतुक केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने 'पठान' कौतुक करत केले आहे.

रविवारी भारतीय क्रिकेट संघांचा माजी खेळाडू बॅटमॅन वीरेंद्र सेहवागने एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया वरून शेअर केला आहे. सेहवागचा हा व्हिडिओ चित्रपटगृहातील असून 'पठान' या चित्रपटादरम्यानचा आहे. सेहवागने हा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन देखील दिले आहे. सेहवागने लिहिले आहे, 'पठान' बघताना खूप मजा अली. मस्त टाइमपास झाला शाहरुख खान.

तसेच वीरेंद्र सेहवागने 'पठान' चित्रपटाचा व्हिडिओ त्याच्या स्टोरीवर शेअर करत '#पठान पैसा वसूल' असे लिहिले आहे. पठान चित्रपटाच्या आनंद घेतल्यानंतर सेहवागने पोस्ट करत त्याच्या अनुभव शेअर केला आहे. तसेच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने देखील तिच्या मित्रमंडळींसह लंडनमध्ये पठान चित्रपट पहिला. सर्वत्र आणि सर्वांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

गेल्या काही महिन्यानापासून बॉयकॉट बॉलिवूडमुळे अनेक बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर कमाल करता आली नव्हती. परंतु 'पठान' चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आणि बॉयकॉटच्या समजुती मोडून यश मिळवले आहे. वर्ल्ड वाईड कलेक्शनमध्ये या चित्रपटाने ५०० कोटींचा एकदा पार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT