Virat Kohli, Anushka Sharma attend FA Cup final at Wembley
Virat Kohli, Anushka Sharma attend FA Cup final at Wembley Instagram @anushkasharma
मनोरंजन बातम्या

Virat-Anushka At FA Cup Final: विराट-अनुष्काने FA CUP ला हजेरी लावत लुटला फूटबॉलचा आनंद ; क्युट व्हिडिओ केला शेअर

Pooja Dange

Virat-Anushka Share Cute Video: विराट-अनुष्का हे नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. दोघेही नेहमीच एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतीच दोघांनी FA कपला हजेरी लावली होती. मॅंचेस्टर येथील वेंबली स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्याचा व्हिडिओ विराट- अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विराट-अनुष्का यांच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. विराट-अनुष्का हे कपल नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलाखतीतील व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये विराटला अनुष्काच्या चित्रपटाचा डायलॉग पुर्ण करायचा होता आणि विराटने तो डायलॉग पूर्णही केला. तर आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये अनुष्काने विराट फिल्डवर कसा असतो हे दाखवले होते. (Latest Entertainment News)

विराट-अनुष्काने व्हिडिओ शेअर केला

विराट-अनुष्काने नुकतीच FAकपला मॅंचेस्टर येथील वेंबली स्टेडियमवर हजेरी लावली होती. याचीच एक रिल विराट-अनुष्काने शेअर केली आहे. यात हे दोघही मॅचचा चांगलाच आनंद घेताना दिसत आहे.

दोघांचे काही व्हिडिओ, फोटो यांची एकत्र रिल केली आहे. दोघेही सामन्याचा पुरेपुर आनंद घेताना दिसत आहे. या दोघांसोबत या सामन्याला आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केलेला शुबमन गिलनेही हजेरी लावली हेती. याचबरोबर सुर्यकूमार यादवने सपत्नीक हजेरी लावली होती. युवराज सिंग देखील सामन्याचा आनंद घेतला. (Celebrity)

विराट-अनुष्का हे पुमाइंडियाचे ब्रॅंड अॅबेसेडर आहेत. दोघेही बऱ्याचदा हा ब्रॅंड प्रोमोट करताना दिसत असतात. रिलच्या सुरवातीला' FA Cup finals 2023 at wembley' असं लिहल आहे. तर रिलच्या शेवटी' and just like the sky...blue reigned the field.'असं लिहल आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

विराटबद्दल बोलायचे तर वल्ड चॅम्पियनशीपसाठी विराट सध्या लंडनमध्ये आहे. त्याची या टेस्टसाठी तयारी सुरू आहे. अनुष्काने यावर्षीच्या कान्स फेस्टिवलमध्ये डेब्यु केला होता. तिच्या नवीन चित्रपटाबद्दल बोलायचं तर 'चकडा एक्सप्रेस' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यात अनुष्का माजी क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

SCROLL FOR NEXT