Aryan Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: हॅलोवीन पार्टीमधील आर्यन खान लूक चर्चेत, आर्यनच्या कृत्यावर संतापले नेटकरी

आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हॅलोवीन पार्टीमध्ये आर्यन स्वॅगमध्ये प्रवेश करताना दिसत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood Halloween Party: बॉलिवूडमध्ये रोज कोणती ना कोणती पार्टी सुरूच असते. नुकताच दिवाळी पार्टीचा जल्लोष पाहायला मिळाला होता. आता बॉलिवूडमधील यंग जनरेशन हॉलोवीन पार्टी साजरी करताना दिसत आहेत. अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर, नव्या नवेली नंदा ते आर्यन खान हे हॅलोवीन पार्टीमध्ये सहभागी झाले होते.

हॅलोवीन पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीमध्ये अनेक स्टार किड्स पाहायला मिळत आहेत. ओरहान अवत्रामणीच्या हॅलोवीन पार्टीत बॉलिवूडचे लोकप्रिय स्टार किड्स वेगवेगळ्या लूकमध्ये दिसले. यादरम्यान आर्यन खानही दिसला आणि त्याने आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Bollywood)

आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हॅलोवीन पार्टीमध्ये आर्यन स्वॅगमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. या पार्टीसाठी केलेला आर्यनचा लूक पाहण्यासारखा होता. शाहरुख खानचा लाडका लेक ब्लॅक लूकमध्ये पार्टीमध्ये पोचला होता. आर्यनने काळ्या पँट आणि टी-शर्टवर जॅकेट घातले होते. आर्यन मोठ्या तोऱ्यात चालत होता आणि तर त्याच्या सुरक्षा रक्षक त्याच्यासाठी छत्री उघडत होता. छत्री पाहून लोक चकित झाली, त्यांना कळलेच नाही की पावसापासून वाचण्यासाठी छत्री उघडली की तो हॅलोवीन एक भाग होता. (Social Media)

हा व्हिडिओसमोर आल्यानंतर त्यावर लोक प्रतिक्रियाही देत ​​आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले आहे की, 'ज्यांनी अद्याप आपली ओळख बनवली नाही, मीडिया त्यांची ओळख निर्माण करत आहे. तो फक्त शाहरुखचा मुलगा आहे बाकी काही नाही. तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, 'तहजीब कशाला म्हणतात याबद्दल तुझ्या वडिलांकडून काहीतरी शिक'. या पोस्टवर बहुतेक लोक आर्यनला ट्रोल करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT