Vikrant Massey Yandex
मनोरंजन बातम्या

Vikrant Massey Retirement: विक्रांत मेस्सीचं काय चाललंय? रिटायरमेंटची चर्चा सुरू का झाली?

Vikrant Massey reveals truth behind his post hinting at retirement : विक्रांत मेस्सीनं त्याच्या रिटायरमेंटच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.

Saam Tv

विक्रांत मेस्सी. हे नाव 12th फेल या चित्रपटानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं. पण चर्चा कुठल्या नव्या चित्रपटाची किंवा अभिनयाची नव्हे, तर ही चर्चा होती रिटायरमेंटची. २ डिसेंबरला त्याने एक लांबलचक पोस्ट लिहिली. पोस्टनुसार, तो अभिनयातून निवृत्ती होणार असल्याचा समज लोकांमध्ये झाला. ज्यामुळे सोशल मिडियावर चाहत्यांकडून प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. या प्रश्नांवर विक्रांतला अखेर उत्तर द्यावं लागलंय.

त्यानं एका मुलाखतीत अभिनयातून संन्यास घेत नसून, ब्रेक घेत असल्याचं स्पष्ट केलं. लोकांपर्यंत मेसेज चुकीचा पोहचला. त्यामुळे पुन्हा लवकरच अभिनय करण्यास सज्ज होईल, असं त्यानं म्हटलं आहे.

लोकांनी चुकीचं वाचलं

२ डिसेंबर रोजी भल्या पहाटे अभिनेता विक्रांत मेस्सीने एक मेसेज सोशल मिडियावर पोस्ट केला. त्या पोस्टवरुन वयाच्या ३७ वर्षी विक्रांत बॉलीवूडमधून रिटायर होत असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. या पोस्टनंतर विक्रांत कुठेच काहीच बोलला नाही. पण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला.

बॉलीवूडमधून निवृत्त होणार असल्याच्या प्रश्नावर विक्रांतने उत्तर दिलं. 'मी रिटायर होत नाहीये. मला फक्त मोठ्या ब्रेकची गरज आहे. माझी तब्येत बिघडली आहे. लोकांपर्यंत माझा मेसेज चुकीचा पोहचला. लोकांनी चुकीचं वाचलं,' असं उत्तर विक्रांतनं दिलं. याचा अर्थ एकच, तो मोठा ब्रेक घेऊन पुन्हा अभिनयसाठी येत्या काळात सज्ज होईल.

विक्रांतने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं?

२ डिसेंबरला विक्रांतने एक मेसेज सोशल मिडियात शेअर केला होता. ज्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता. यात तो म्हणाला होता, 'हॅलो, मागील काही वर्षे आणि तेव्हापासूनचा काळ खूप छान होता. तुम्ही जे मला प्रेम देत आहात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण जसजसं मी आयुष्यात पुढे सारकतोय, तसतसं मला वाटते की आता घरी जाण्याची वेळ आली आहे. पती, वडील, मुलगा आणि अभिनेता म्हणूनही ब्रेक घेत आहे. २०२५ मध्ये आपली शेवटची भेट होईल.'

या मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विक्रांत नक्की अभिनयातून निवृत्त होणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता रिटायर नाही तर, ब्रेक घेत असल्याचं सांगत विक्रांतनं चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नव्या वर्षात २ चित्रपटातून प्रेक्षकांची घेणार भेट

विक्रांतचे दोन चित्रपट २०२५ साली प्रदर्शित होणार आहेत. पहिल्या चित्रपटाचे नाव 'ऑंखो की गुस्ताखियां आणि दुसऱ्या चित्रपटाचे नाव 'यार जिगरी' आहे. हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT