Vijay Varma Reacted On Tamannaah Dimond Ring Instagram
मनोरंजन बातम्या

Vijay Varma On Tamannaah Bhatia: तमन्नाच्या २ कोटींच्या डायमंड रिंगवर विजय वर्माची प्रतिक्रिया

Vijay Varma Reacted On Tamannaah Ring : विजय वर्माला तमन्नाकडे असलेल्या जगातील 5 व्या सर्वात मोठा हिऱ्याविषयी विचारण्यात आले.

Pooja Dange

Vijay Varma On Tamannaah Bhatia Diamond Ring :

तमन्ना भाटिया गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आहेत. तिच्याकडे जगातील 5 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा असल्याचे समजल्यापासून या चर्चा अधिक वाढल्या आहेत. इंटरनेटवर अभिनेत्रीचे जुना फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या.

या फोटोमध्ये तमन्नाच्या बोटावर चमकदार हिरा दिसत आहे. साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला हिने तिला हिरा भेट म्हणून दिला आहे. मात्र, हे सर्व खोटे असून तमन्नाने स्वत: सोशल मीडियावर याचा खुलासा केला आहे. आता तिच्या बॉयफ्रेंड विजय वर्माने या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे.

सिद्धार्थ कन्ननला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, विजय वर्माला तमन्नाकडे असलेल्या जगातील 5 व्या सर्वात मोठा हिऱ्याविषयी विचारण्यात आले. तेव्हा तो हसला आणि त्याने यावर खुलासा करत म्हटले की, “तुम्हाला माहित आहे ना हे सर्व काय आहे ते ? ते बॉटलच झाकण आहे. त्या गंमत करत आहेत एकमेकांसोबत.

मीडिया ही बातमी चालवत आहे, 2 कोटी रुपयांचा जगातील सर्वात मोठा हिरा. 2 कोटी रुपयात पाचव्या क्रमांकाचा डायमंड कसा मिळेल?” तो पुढे म्हणाला, "मी तिला मेसेज केला के ही फेक न्युज आहे ना, मी माझं नाव का नाही लिहिलं यात ?"

विजयला म्हणायचे होते की कर ही बातमी खोटी आहे तर ती अंगठी मीच दिली आहे असं सांगायचं ना. (Latest Entertainment News)

काही दिवसांपूर्वीच तमन्नाने स्वतः या वृत्तावर खुलासा केला होता. तिने सोशल मीडियावर लिहिले होते की, "हे सांगायला खूप दुःख होत आहे. आम्ही हिऱ्यासोबत नव्हे तर बॉटल ओपनर घेऊन फोटोशूट करत होतो.

तर २०१९साली उपासनाने तमन्नाचा कॅमेरासमोर फ्लॉंट करतानाचा फोटो अपलोड केला होता. त्याला तिने #GirlsLiketoClickPics" फ्रॉम मिसेस प्रोड्युसरडून सुपर @tamannaahspeaks साठी एक भेट. तुला आधीच मिस करत आहे. लवकरच भेटूया. असे कॅप्शन दिले होते.

तमन्ना भाटियाविषयी बोलायचे झाले तर सध्या तिचे कावाला हे गाणं ट्रेंड करत आहे. त्याआधी तमन्ना लस्ट स्टोरी २मुळे चर्चेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT