Vijay Devananda Donate 1 crore Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Devarakonda Man Of Words: करून दाखवलं! चित्रपटाच्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेत्याची १०० कुटुंबांना कोट्यवधींची मदत

Vijay Devananda Help Needy: विजय देवरकोंडाने 'ख़ुशी' चित्रपटाचे यश त्याच्या फॅन्ससोबत साजरे केले आहे.

Pooja Dange

Vijay Devarakonda Help 100 People:

विजय देवरकोंडाने 'ख़ुशी' चित्रपटाचे यश त्याच्या फॅन्ससोबत साजरे केले आहे. विजय देवरकोंडाने सांगितल्याप्रमाणे १०० कुटुंबांना एक-एक लाख रुपयांचा चेक दिला आहे. हैद्राबादला आयोजित या कार्यक्रमाला विजय देवरकोंडा, चित्रपटाचे दिग्दर्शक शिव निर्वाण, निर्माते नवीन येरनेनी उपस्थित होते.

चित्रपटाचे निर्माते नवीन येरनेनी यांनी या वेळी सांगितले की, 'आमच्या खुशी या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. तसेच चित्रपट सुपरहिट देखील ठरला आहे. या यशासाठी आम्ही प्रेक्षक आणि फॅन्सचे आभार मानतो. मला आनंद आहे की विजयने १०० लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि ही मोहीम आमच्या चित्रपटापासून सुरू झाली. विजयने उचलेल्या या पावले सगळ्यांना प्रेरणा मिळेल.'

विजय देवरकोंडाच्या या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत समंथा रूथ प्रभू देखील होती. या दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजय देवरकोंडाने १०० गरजूंना १-१ लाखाची मदत करणार असे सांगितले होते. विजयने त्याचा दिलेला शब्द पळाला. चित्रपटाच्या यशानंतर त्याने गरजूंना मदत केली आहे.

विजय देवरकोंडाने यावेळी म्हटले की, 'प्रेक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्यासाठी मला अनेक चांगले उपक्रम राबवायचे आहेत. कारण मलाही एकदा वाटले होते की, आम्हाला कोणी अशी मदत केली तर किती चांगले होईल. जेव्हा मी शिकत होतो तेव्हा माझे सर्व मित्र सुट्टीत फिरायला जायचे, मी घरीच राहायचो कारण मला पैसे मागून माझ्या आईवडिलांना त्रास द्यायचा नव्हता. मग माझे मित्र सुट्ट्या कशा एन्जॉय करत असतील असा प्रश्न मला पडायचा.

आम्ही माझ्या भावाच्या इंजिनियर फीसाठी धडपडत करत होतो, तेव्हा माझ्या डोळ्यात आलं की गरजूंना कोणी का मदत करत नाही. मी सर्व अडचणींवर मात करून मी हा प्रवास पूर्ण केला आहे. आज तुम्हाला मदत करता यावी ही माझी स्वतःची इच्छा आहे. हे एक लाख रुपये मिळाल्यानंतर जर तुम्हाला थोडा आनंद मिळाला आणि तणाव कमी झाला तर मला समाधान मिळेल. ही छोटीशी मदत जर तुमच्या कमी आली तर मला आनंद होईल. मी माझे प्रेम तुमच्यासोबत शेअर करत आहे.

गेल्या वेळी काही तरुणांना पिकनिकला पाठवले होते. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. आम्ही फक्त 100 लोकांना हे पैसे देऊ शकतो. दरवर्षी मी वेगवगेळ्या लोकांना मदत करतो. जोपर्यंत मी खंबीर आहे, जोपर्यंत मी चित्रपट करत राहीन, तोपर्यंत मी तुम्हाला साथ देत राहीन. तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT